राष्ट्रीय शालेय बास्केटबाॅल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

Maharashtra basketball team decleared  Top Breaking News in marathi
Maharashtra basketball team decleared Top Breaking News in marathi

सातारा  जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सोलापूर आणि शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अकूलज येथील विजयसिंह मोहिते क्रीडा संकूल येथे राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा 14 वर्षाखालील मुले आणि मुली तसेच 17 वर्षाखालील मुले आणि मुली अशा दोन वयोगटात घेण्यात आली.
 
स्पर्धेतील सर्व सामने संपन्न झाल्यानंतर त्याच ठिकाणी राज्यातील विविध विभागातून आलेल्या खेळाडूंची तसेच स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या आणि सहभागी खेळाडूंमधून निवडलेल्यांची राष्ट्रीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड चाचणी झाली. त्यामधून राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघाची निवड करण्यात आली.
 
शिवछत्रपती पुरस्कार्थी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अर्निका गुजर - पाटील , शिवछत्रपती पुरस्कार्थी एनआयएस प्रशिक्षक मनिषा डांगे, राज्य क्रीडा मार्गदर्शक वासुदेव थिटे या निवड समितीने निवडलेल्या संघाची घोषणा जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांनी केली.
 
राष्ट्रीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेसाठी राज्य आंतरशालेय बास्केटबॉल संघामध्ये 14 वर्षाखालील मुलांच्या गटात कुणाल शिराळे (कोल्हापूर विभाग), मृणमय बोरसे (पुणे विभाग), अथर्व परदेशी (कोल्हापूर विभाग), गणेश भंडारी (लातूर विभाग), ओमकार जोशी (पुणे विभाग), निलय खेमका (औरंगाबाद विभाग), सार्थक धुळघुले (नागपूर विभाग), ध्रुव निकम (कोल्हापूर विभाग), अभीर गोखले (कोल्हापूर विभाग), यश सोनावणे (नाशिक विभाग), मेघ आत्रे (पुणे विभाग), अर्नव रेड्डी (लातूर विभाग) यांचा समावेश आहे. याबरोबरच राखीव खेळाडूंमध्ये व्यंकट संगनाथन (मुंबई विभाग), आदित्य साळूंखे (नाशिक विभाग), ओम राऊत (औरंगाबाद विभाग), सूरज दुपरा (मुंबई विभाग), शिवम मंचदा (पुणे विभाग) यांचा समावेश आहे.
 
राष्ट्रीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेसाठी राज्य आंतरशालेय बास्केटबॉल संघामध्ये 14 वर्षाखालील मुलींच्या संघात अनया भावसर (पुणे विभाग ), इफा इनामदार (कोल्हापूर विभाग), श्रुतीका अरगड (पुणे विभाग), सिद्धी शिंदे (कोल्हापूर विभाग), समीक्षा चांडक (नागपूर विभाग), अन्जा खान (मुंबई विभाग), साक्षी सिंघानिया (नाशिक विभाग), ऋतुजा नलवडे (मुंबई विभाग), ईश्‍वरी कुंभार (कोल्हापूर विभाग), दुर्वा म्हपीड (पुणे विभाग), गुंजन मंत्री (नागपूर विभाग), सारा चौपडे (पुणे विभाग) यांचा समावेश आहे. याबरोबरच राखीख खेळाडूंमध्ये श्रेया जाधव (नाशिक विभाग), अनुष्का सिंग (मुंबई विभाग), जुही जाधव (औरंगाबाद विभाग), अनुज राव (मुंबई विभाग), श्रावणी ठोंबरे (पुणे विभाग) यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com