राष्ट्रीय बास्केटबाॅल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने गाठली उपांत्य फेरी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 December 2019

सातारा : महाराष्ट्रच्या सिया देवधर, धारा फाटे, शोमिरा बिडये यांनी अन्य खेळाडूंच्या साथीने बहारदार खेळ करीत आज (शुक्रवारी) ओरिसा संघास तब्बल 14 गुणांनी पराभवाची धूळ चारत येथे सुरु असलेल्या 17 वर्षाखालील मुलींच्या गटातील 65 व्या राष्ट्रीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेची उपांत्यपुर्व फेरी गाठली. 

सातारा : महाराष्ट्रच्या सिया देवधर, धारा फाटे, शोमिरा बिडये यांनी अन्य खेळाडूंच्या साथीने बहारदार खेळ करीत आज (शुक्रवारी) ओरिसा संघास तब्बल 14 गुणांनी पराभवाची धूळ चारत येथे सुरु असलेल्या 17 वर्षाखालील मुलींच्या गटातील 65 व्या राष्ट्रीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेची उपांत्यपुर्व फेरी गाठली. 

हेही वाचा - लग्नाच्या वाढदिवशी विराटने अनुष्काला दिलं स्पेशल गिफ्ट!
 
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि के.एस.डी.शानभाग विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील के.एस.डी.शानभाग विद्यालयाच्या मैदानावर होत असलेली ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी होऊ लागली आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रच्या मुलींचा जिगरबाज खेळ ; केरळला नमविले

आज (शुक्रवार) सकाळच्या सत्रात महाराष्ट्र विरुद्ध ओरिसा यांच्यात सामना झाला. सामन्याच्या पहिल्या सत्रापासून महाराष्ट्र संघाने चेंडूवर नियंत्रण मिळवित 11-03 अशी नऊ गुणांची आघाडी घेतली. त्यानंतरही महाराष्ट्र संघातील तन्वी साळवे, भक्ती लहामगे यांनी सियाच्या साथीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले.

खेळाच्या तिसऱ्या सत्रात ओरिसा संघाने आक्रमक खेळ करीत एकापाठोपाठ एक बास्केट नोंदविले. त्यास महाराष्ट्र संघातील भुमिका सरजे, धारा, सिया यांनी प्रत्युत्तर देत संघाचा गुणफलक हलता ठेवला. महाराष्ट्र संघाने हा सामना 54-40 असा 14 गुणांच्या फरकाने जिंकला.

स्पर्धेतील अन्य सामन्यांचे निकाल असे...

राजस्थान 48 वि.वि. केरळ 47
तामिळनाडू 89 वि.वि. के.व्ही.एस. 62
छत्तीसगढ 69 वि.वि. राजस्थान 27
पंजाब 38 वि.वि. सी.बी.एस.बी. डब्ल्यू.एस.ओ. 15
हरियाणा 44 वि.वि. चंदिगढ 14
सी.आय.एस.बी.सी. 47 विरुद्ध आय.पी.एस.सी 29
कर्नाटक 34 वि.वि. उत्तर प्रदेश 24. 

उपांत्यपुर्व फेरी निकाल
 
महाराष्ट्र विरुद्ध सी.आ एस.सी.ई यांच्यातील सामन्यात महाराष्ट्र संघाने 83 - 53 असा दणदणीत विजय मिळविला.
 

अन्य एका सामन्यात पंजाब विरुद्ध तामिळनाडू या सामन्यात तामिळनाडू संघाने 80 -41 अशी बाजी मारली. 

दरम्यान मैदान क्रमांक एकवर छत्तीसगढ विरुद्ध हरियाणा तसेच मैदान क्रमांक दोनवर राजस्थान विरुद्ध कर्नाटक हा सामना सुरु झाला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Girls Basketball Team Enters In Semi Final Of School National Basketball Championship