esakal | महाराष्ट्र केसरी 2020 : अपंगत्वावर मात करत शशिकांत गाजवतोय आखाडे!
sakal

बोलून बातमी शोधा

Shashikant-Akhade

अपंगत्वावर मात करत आखाडे गाजवणाऱ्या शशिकांतला प्रशिक्षक सुनील मोहिते कुस्तीचे धडे देत आहेत.

महाराष्ट्र केसरी 2020 : अपंगत्वावर मात करत शशिकांत गाजवतोय आखाडे!

sakal_logo
By
संपत मोरे

महाराष्ट्र केसरी 2020 : पुणे : कुस्तीसाठी शरीरसंपदा बलवान असावी लागते. कुस्ती ताकदीवर खेळला जाणारा खेळ आहे; पण कुंडल येथील क्रांती आखाड्यात सराव करणारा शशिकांत गावडे हा पायाने आणि हाताने अपंग असलेला पैलवान.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्याने अनेक ताकदवान पैलवानांना चितपट केले आहे. अपंगत्वावर मात करत अनेक क्षेत्रांत यश मिळवल्याच्या यशोगाथा आपण ऐकल्यात; पण गावडे याने ज्या खेळात हातपाय धड असावे लागतात अशा कुस्ती क्षेत्रात आपले नाव केले आहे. 

- महाराष्ट्र केसरी 2020 : पंढरपूरच्या अटकळे बंधूंचा सुवर्णवेध!

त्याचे दोन्ही पाय कमजोर आहेत. हाताची बोटे लहान आहेत; मात्र आसपासच्या परिसरातील कुस्तीचे वातावरण पाहून त्याने सराव सुरू केला. बघताबघता त्याने अनेक मैदानांत लोकांची वाहवा मिळवली. त्याची कुस्तीतील जिगर पाहून कुस्तीशौकीन त्याला बक्षिसे देतात. मग शशिकांतचा हुरूप वाढतो.

- Breaking : इरफान पठाणची क्रिकेटमधून निवृत्ती

क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी शशिकांतला बळ दिले आहे. अपंगत्वावर मात करत आखाडे गाजवणाऱ्या शशिकांतला प्रशिक्षक सुनील मोहिते कुस्तीचे धडे देत आहेत.

- महाराष्ट्र केसरी 2020 : आखाडा बनविण्यासाठी लिंबू-कापूर-ताक-तेल 

पायाने आणि हाताने अपंग असलेला या पैलवान रोज जोर काढतो, हे त्याने सांगून पटत नाही; पण तो जेव्हा समोरच्या जोडीदाराशी भिडतो, लढतो तेव्हा त्याचे कौतुक करायला आपलाही हात खिशात जातो.