जागतिक  कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या राहुल आवारेला भारतीय संघात स्थान

Maharashtra wrestler Rahul Aware
Maharashtra wrestler Rahul Aware

नवी दिल्ली -  टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीतील भारताचा प्रमुख आशास्थान असलेल्या बजरंग पुनियाला नूर सुलतान (कझकस्तान) येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेत 65 किलो गटात अव्वल मानांकन देण्यात आले आहे. भारतीय कुस्तीसाठी सर्वात महत्वाची असलेली ही स्पर्धा 14 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. 

बजरंगसह दोन ऑलिंपिक पदकांचा मानकरी सुशील कुमार, ऑलिंपिक ब्रॉंझविजेती साक्षी मलिक, पूजा धांदा, विनेश फोघट आणि महाराष्ट्राचा आशास्थान राहुल आवारे या स्पर्धेत खेळणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिंपिकसाठी ही जागतिक स्पर्धा महत्वाची आहे. 

2013 मध्ये 60 किलो गटात ब्रॉंझ, 2013 मध्ये 65 किलोमध्ये रौप्य अशी पाच वर्षात प्रगती बजरंगने केलेली आहे. यंदा सुवर्णपदापर्यंत मजल मारण्यासाठी तो सज्ज झाला आहे. 2010 मध्ये सुशील कुमारने जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते त्यानंतर आत्तापर्यंत कोणत्याही भारताला हा गौरव मिळवता आलेला नाही. 

परदेशी कुस्तीपटूंसह परदेशात केलेला सराव मला परिपूर्ण ठरवत आहे, असे बजरंगने सांगितले. ही जागतिक स्पर्धा ऑलिपिक पात्रताही आहे. त्यामुळे प्रत्येक कुस्तीपटू सर्वस्व देण्यास सज्ज आहे. 

ही जागतिक कुस्ती होणाऱ्या नूर सुलतानमधील ऑलिंपिक सायकलिंग सेंटर येथे येथे 4 तारखेपासूनच सराव शिबिर सुरु झालेले आहे. विनेश फोघटचा अपवाद वगळता भारतीय संघातील खेळाडू येथे सराव करत आहेत. सध्या जागतिक क्रमवारीत सहव्या क्रमांकाव असलेली विनेश यंदा 53 किलो गटात खेळणार आहे. 

राहुल आवारेला दुसरे मानांकन 
महाराष्ट्राच्या राहुल आवारेला 61 किलो गटात दुसरे मानांकन देण्यात आले आहे. राहुलबरोबर सुशील कुमारवरही सर्वांचे लक्ष असेल. 74 किलो गटात खेळणारा सुशील कुमार आठ वर्षानंतर या स्पर्धेत आपले नशिब आजमावणार आहे. 14 ते 22 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या जागतिक स्पर्धेत जगभरातील एक हजार मल्ल खेळमार आहे. 

असा आहे संघ - फ्रिस्टाईल - रवी कुमार (57 किलो), राहुल आवारे (61), बजरंग पुनिया (65), करन (70), सुशील कुमार (74), जितेंद्र (79), दीपक पुनिया (86), प्रवीण (92), मौसम खत्री (97), सुमीत (125). 

महिला - सीमा (50 किलो), विनेश फोघट (53), ललिता (55), सरिता (57), पूदा धांदा (59), साक्षी मलिक (62), नवजोत कौर (68), दिव्या काकरन (68), कोमल गोळे (72), किरण (76) 

ग्रीको रोमन - मनजीत (55 किलो), मनिष (60), सागर (63), मनिष कुमार (67), योगेश 72), गुरप्रीत सिंग (77), हरप्रीत सिंग (82), सुनील कुमार (87), रवी (97), नवीन (130)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com