'फिनिशर' धोनीला अखेर गवसला सूर

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 जानेवारी 2019

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धावांचा पाठलाग करताना धोनीला मोठी खेळी करून संघाला विजय मिळवून देण्याची संधी होती. त्याने अर्धशतकी खेळी केलीही पण त्याच्या संथ फलंदाजीमुळे त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली.

ऍडलेड : फिनिशर अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीला अखेर काही वर्षांनंतर आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली असून, धोनीने अर्धशतकी खेळी करत भारताला ऍडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धावांचा पाठलाग करताना धोनीला मोठी खेळी करून संघाला विजय मिळवून देण्याची संधी होती. त्याने अर्धशतकी खेळी केलीही पण त्याच्या संथ फलंदाजीमुळे त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली. भारताला हा सामनाही गमवावा लागला होता. मात्र, आज धोनीने जबाबदारीने फलंदाजी करत अखेरपर्यंत किल्ला लढविला आणि भारताला विजय मिळवून दिला. त्याला दिनेश कार्तिकने चांगली साथ दिली. धोनीने आपल्या स्टाईलमध्ये षटकार खेचत विजयाजवळ नेले. अर्थात या विजयात मोलाचा वाटा होता तो कर्णधार विराट कोहलीचा.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा : 
'फिनिशर' धोनी अखेर 'फिनिश' करण्यात यशस्वी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahendra Singh Dhoni fifty against Australia at Adelaide