दुसऱ्याच फेरीत साईनाचे आव्हान संपुष्टात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 जून 2018

भारताच्या साईना नेहवाल हिचे मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत आव्हान संपुष्टात आले. जपानच्या अकाने यामागुची हिने तिचा पराभव केला. 

क्वालालंपूर (मलेशिया) - भारताच्या साईना नेहवाल हिचे मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत आव्हान संपुष्टात आले. जपानच्या अकाने यामागुची हिने तिचा पराभव केला. 

साईनाला या लढतीत सातत्य राखता आले नाही. साईनाला 36 मिनिटे चाललेल्या लढतीत यामगुची हिच्याकडून 15-21, 13-21 असा पराभव पत्करावा लागला. 

यामागुचीविरुद्धच्या सातव्या लढतीत साईनाचा हा सहावा पराभव होता. साईनाने 2014 मध्ये चीन ओपन स्पर्धेत यामागुची हिच्याविरुद्ध एकमात्र विजय मिळविला आहे. यामागुचीने आज 9-2 अशी सहज सुरवात केली होती. मात्र, साईनाने मध्यात तिची 10-11 अशी आघाडी घेतली. त्याच वेळी यामागुचीने सलग आठ गुणांची कमाई करताना 18-11 अशी आघाडी मिळवली आणि त्यानंतर पहिली गेम जिंकली. दुसऱ्या गेमलसाही यामागुची हिने 8-2 अशी सुरवात करत साईनावर सहज विजय मिळविला.

Web Title: Malaysia Open badminton Saina Nehwal