मलिंगाच्या चार चेंडूंत चार विकेट 

Malinga Claims 4 Wickets In 4 Balls In 3rd T20
Malinga Claims 4 Wickets In 4 Balls In 3rd T20

पल्लीकल - श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसित मलिंगाने न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या तिसऱ्या टी20 लढतीत एकाच षटकात सलग चार चेंडूंवर चार विकेट घेतल्या. हॅट्‌ट्रीकच्या पराक्रमासह त्याने एकूण पाच विकेट टिपल्या. 

किवींनी पहिले दोन सामने जिंकून मालिकेतील विजय यापूर्वीच नक्की केला होता, पण 126 धावांच्या आव्हानासमोर 88 धावांत डाव संपून पत्करावा लागलेला 37 धावांचा पराभव त्यांच्यासाठी मानहानीकारक ठरला. मलिंगाने वर्ल्ड कपनंतर वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो टी20 कर्णधार आहे. 

संक्षिप्त धावफलक 
श्रीलंका - 20 षटकांत 8 बाद 125 (धनुष्का गुणतिलका 30, निरोशन डिकवेला 24, लाहिरू मधूशांका 20, वानींदू हसारंगा 14, मिचेल सॅंटनर 4-1-12-3, टॉड ऍस्टल 4-0-28-3) विवि न्यूझीलंड - 16 षटकांत सर्वबाद 88 (कॉलीन मुन्रो 12, सॅंटनर 16, टीम साऊदी नाबाद 28-23 चेंडू, 3 षटकार, मलिंगा 4-1-6-5, अकिला धनंजया 4-0-28-2) 

मलिंगाचा पराक्रम 
- एका षटकातील सलग चार चेंडूंवर विकेट 
- तिसऱ्या षटकात ही कामगिरी 
- तिसऱ्या चेंडूवर कॉलीन मुन्रोचा (12) त्रिफळा 
- चौथ्या चेंडूवर हॅमीश रुदरफोर्ड (0) पायचीत 
- पाचव्या चेंडूवर कॉलीन डी ग्रॅंडहोमचा (0) त्रिफळा 
- सहाव्या चेंडूवर रॉस टेलर (0) पायचीत 
- टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हॅट्‌ट्रीक घेतलेला एकमेव गोलंदाज 
- यापूर्वी 2016-17 मध्ये बांगलादेशविरुद्ध हॅट्ट्रिक 
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक पाचवी हॅट्‌ट्रीक 
- पाकिस्तानच्या वसिम अक्रमचा चार हॅट्ट्रिकचा उच्चांक मोडला 
- टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 100 विकेट 
- अशी कामगिरी केलेला पहिलाच गोलंदाज 
- वैयक्तिक सर्वोत्तम गोलंदाजी 
- यापूर्वी 31 धावांत 5 विकेट 
- कारकिर्दीत दुसऱ्यांदा पाच विकेटची कामगिरी 
- सलग चार चेंडूंवर चार विकेट घेतलेला दुसरा गोलंदाज 
- यापूर्वी अफगाणिस्तानच्या रशीद खानकडून हा पराक्रम 
- 76 सामन्यांत 104 विकेट 
- पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा (98 विकेट) उच्चांक यापूर्वीच पार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com