टेबल टेनिसपटू मानव ठक्कर युवा ऑलिंपिकसाठी पात्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

बॅंकॉक - भारताचा टेबल टेनिसपटू मानव ठक्कर याने अर्जेंटिनात होणाऱ्या युवा ऑलिंपिकसाठी मंगळवारी आपले तिकीट निश्‍चित केले. त्याने पात्रता फेरीत सिंगापूरच्या शाओ जोश चुआ याचा ४-० असा पराभव करून ही पात्रता सिद्ध केली. मानव कुमार गटात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने चुआचा ११-४, ११-७, ११-२, ११-९ असा पराभव केला. भारताच्या अर्चना कामथ याची ऑलिंपिक वारी मात्र तिसऱ्यांदा हुकली. तिला उपांत्यपूर्व फेरीत हंगेरीच्या फानी हॅराझटोविचकडून ३-४ असा पराभव पत्करावा लागला. आपल्या उपलब्धीबद्दल मानव म्हणाला, ‘‘यापूर्वी तीनवेळा माझी संधी हुकली होती. या वेळी मी पात्र ठरलो. खूप आनंद झाला आहे.

बॅंकॉक - भारताचा टेबल टेनिसपटू मानव ठक्कर याने अर्जेंटिनात होणाऱ्या युवा ऑलिंपिकसाठी मंगळवारी आपले तिकीट निश्‍चित केले. त्याने पात्रता फेरीत सिंगापूरच्या शाओ जोश चुआ याचा ४-० असा पराभव करून ही पात्रता सिद्ध केली. मानव कुमार गटात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने चुआचा ११-४, ११-७, ११-२, ११-९ असा पराभव केला. भारताच्या अर्चना कामथ याची ऑलिंपिक वारी मात्र तिसऱ्यांदा हुकली. तिला उपांत्यपूर्व फेरीत हंगेरीच्या फानी हॅराझटोविचकडून ३-४ असा पराभव पत्करावा लागला. आपल्या उपलब्धीबद्दल मानव म्हणाला, ‘‘यापूर्वी तीनवेळा माझी संधी हुकली होती. या वेळी मी पात्र ठरलो. खूप आनंद झाला आहे. प्रशिक्षक मॅसिमो कॉस्टन्टिनी यांचा यात मोठा वाटा आहे.’’

Web Title: manav thakkar olympic selection for table tennis