रणबीर कपूरच्या संघाची मॅंचेस्टर सिटीकडून खरेदी?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

प्रीमियर लीग विजेते मॅंचेस्टर सिटीचे मालक आता इंडियन सुपर लीगमध्ये असलेला मुंबई सिटी एफसी हा संघ खरेदी करणार असल्याची शक्‍यता आहे. लंडनमधील "मिरर' या दैनिकाने हे वृत्त दिले आहे, पण मुंबई सिटी एफसीने पुरेशी माहिती न घेताच दिलेली बातमी असल्याचा दावा केला आहे.

मुंबई : प्रीमियर लीग विजेते मॅंचेस्टर सिटीचे मालक आता इंडियन सुपर लीगमध्ये असलेला मुंबई सिटी एफसी हा संघ खरेदी करणार असल्याची शक्‍यता आहे. लंडनमधील "मिरर' या दैनिकाने हे वृत्त दिले आहे, पण मुंबई सिटी एफसीने पुरेशी माहिती न घेताच दिलेली बातमी असल्याचा दावा केला आहे.

मॅंचेस्टर सिटी क्‍लबच्या मालकांकडे अन्य सहा क्‍लबही आहेत. आयएसएलचा नवा मोसम 20 ऑक्‍टोबरला सुरू होईल. त्यापूर्वी या लीगमधील संघाची मालकी असावी, असा मॅंचेस्टर सिटी प्रमुखांचा प्रयत्न होता. त्यादृष्टीने त्यांनी आयएसएलमधील क्‍लबबरोबर चर्चा सुरू केली होती. आता मुंबई सिटी एफसीबरोबरील करार दृष्टिपथात आहे, याबाबतची क्‍लबचे सीईओ इंद्रनील दास ब्लाह यांच्याबरोबरील चर्चा जवळपास संपली आहे, असे वृत्त "मिरर'ने दिले आहे.

ब्लाह यांनी याबाबत काहीही टिपण्णी करणे टाळले, पण क्‍लबच्या एका पदाधिकाऱ्याने ही बातमी पुरेशी माहिती न घेताच दिली असल्याचा दावा केला. मॅंचेस्टर सिटीची मालकी असलेल्या सीएफजीकडे न्यूयॉर्क सिटी एफसी, मेलबर्न सिटी, क्‍लब ऍटलेटिको टॉर्क्वे (उरुग्वे) तसेच सिआचुआन जिऊनिउ (चीन) यांची मालकी आहे. तसेच गिरोमा (स्पेन) योकोहामा एफ मारिनोज (जपान) या क्‍लबमध्येही त्यांचा मोलाचा वाटा आहे. सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फेरान सोरिआनो यांनी आम्हाला भारतीय मार्केट खुणावत असल्याचे मार्चमध्ये सांगितले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manchester city set to purchase ranbir kapur's team