मॅंचेस्टर सिटीचे मानधनावर एक अब्ज युरो खर्च

वृत्तसंस्था
Tuesday, 10 September 2019

प्रीमियर लीग विजेत्या मॅंचेस्टर सिटीने या मोसमात खेळाडूंच्या मानधनासाठी एक अब्जाहून जास्त युरो (80 अब्जाहून जास्त रुपये) मोजले आहेत. एक अब्ज युरोचा टप्पा पार केलेला सिटी हा पहिला संघ ठरला आहे.

लंडन : प्रीमियर लीग विजेत्या मॅंचेस्टर सिटीने या मोसमात खेळाडूंच्या मानधनासाठी एक अब्जाहून जास्त युरो (80 अब्जाहून जास्त रुपये) मोजले आहेत. एक अब्ज युरोचा टप्पा पार केलेला सिटी हा पहिला संघ ठरला आहे.

स्वीसमधील एका संस्थेच्या अहवालानुसार सिटीने आपला संघ तयार करण्यासाठी खेळाडूंच्या मानधनावर एक अब्ज एक कोटी 40 लाख युरो मोजले. त्याखालोखाल फ्रेंच विजेते पीएसजी (91 कोटी 30 लाख युरो) आणि रेयाल माद्रिद (9 कोटी 2 लाख युरो) आहेत.

केवळ प्रीमियर लीगचा विचार केल्यास मॅंचेस्टर युनायटेड (75 कोटी 10 लाख युरो) आणि लिव्हरपूल (63 कोटी 90 लाख युरो) हे सिटीपाठोपाठ आहेत. प्रीमियर लीगमधील संघांची सरासरी रक्कम 34 कोटी 50 लाख युरो आहे. युरोपातील पाच अव्वल देशात सर्वात कमी रक्कम जर्मनीतील पॅदेरबोर्न (40 लाख युरो) संघाने खर्च केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manchester city spend one billion euro to form the team