मांजरेकर आणि पोलार्डची शाब्दिक चकमक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

मुंबई - रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स कोलकाता नाईटरायडर्सचा पराभव करत असताना समाचोलक संजय मांजरेकर आणि किएरॉन पोलार्ड यांच्यात शाब्दिक चकमक झडली. मांजरेकरला "शाब्दिक अतिसार' झाल्याचे ट्विट पोलार्डने केले आहे.

आयपीएलमधील या सामन्यात मुंबई इंडियन्स 179 धावांचा पाठलाग करत असताना पोलार्डला 17 चेंडूत 17 धावाच करता आल्या. तो बाद झाला तेव्हा मुंबईची 5 बाद 119 अशी अवस्था झाली होती. या वेळी समालोचन करत असलेल्या मांजरेकर यांनी पोलार्डवर टीका करताना तो सहाव्या किंवा सातव्या क्रमांकासाठीच योग्य फलंदाज असल्याचे वक्तव्य केले होते.

फलंदाजीसाठी पोलार्डचा कोणता क्रमांक योग्य आहे, असा प्रश्‍न साथीदार समालोचकांनी विचारला, त्यावर मांजरेकर यांनी हे उत्तर दिले होते. आपल्याविषयी मांजरेकर यांनी अशी खोचक टिप्पणी केल्याचे समजताना पोलार्डने ट्विटरचा आसरा घेतला आणि एकापाठोपाठ एक असे ट्‌विट केले. शाब्दिक अतिसार झाल्याचे तो म्हणालाच; शिवाय शब्द हे फार ताकदवर असतात. एकदा ते तोंडातून बाहेर पडले की मागे घेता येत नाहीत, असे त्याने सुनावले.

Web Title: manjarekar & polard disturbance