मनप्रीत, राणी हॉकी संघाचे कर्णधार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

मनप्रीत सिंग आणि राणी रामपाल ऑलिंपिक पात्रता हॉकी लढतीत भारतीय संघाचे नेतृत्व करतील. भारतीय पुरुष संघ रशियाविरुद्ध, तर महिला संघ अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. या लढती 1 आणि 2 नोव्हेंबरला भुवनेश्‍वरला होतील.

मुंबई : मनप्रीत सिंग आणि राणी रामपाल ऑलिंपिक पात्रता हॉकी लढतीत भारतीय संघाचे नेतृत्व करतील. भारतीय पुरुष संघ रशियाविरुद्ध, तर महिला संघ अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. या लढती 1 आणि 2 नोव्हेंबरला भुवनेश्‍वरला होतील.

ऑलिंपिक पात्रता लढत असल्यामुळे संघात फारसे बदल करण्यात आलेले नाहीत. इंग्लंड दौऱ्यावरील महिला संघ कायम ठेवण्यात आला आहे. "आम्ही समतोल संघ निवडला आहे आणि त्यावेळी विविध पर्याय खुले राहतील हा विचारही केला आहे. आता सर्व लक्ष रशियाविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वतयारीवर केंद्रीत केले आहे,' असे पुरुष संघाचे मार्गदर्शक ग्रॅहम रिड यांनी सांगितले.

आमचा संघ समतोल आहे. त्यात अनुभव तसेच तरुण खेळाडूंचा चांगला संगम आहे. ऑलिंपिक पात्रता लढत लक्षात घेऊनच संघ निवड केली आहे. सरावातील कामगिरीही निवडीच्यावेळी लक्षात घेतली, असे महिला संघाचे मार्गदर्शक शूअर्ड मरिन यांनी सांगितले.

भारतीय संघ
पुरुष : 
पी आर श्रीजेश, कृष्णन बहादूर पाठक, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, सुरेंदर कुमार, गुरिंदर सिंग, रुपिंदर पाल सिंग, अमित रोहिदास, मनप्रीत सिंग (कर्णधार), नीलकांत शर्मा, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, ललित कुमार उपाध्याय, एस व्ही सुनील (उपकर्णधार), मनदीप सिंग, आकाशदीप सिंग, रमणदीप सिंग, सिमरनजीत सिंग.
महिला : सविता (उपकर्णधार), रजनी एतिमार्पू, दीप ग्रेस एक्का, गुरजीत कौर, रिना खोखर, सलीमा टेटे, राणी रामपाल (कर्णधार) शीला चानू, निक्की प्रधान, मोनिका, नेहा गोयल, लिलीमा मिंझ, नमिता टोप्पो, वंदना कटारिया, नवनीत कौर, लालरेमसियामी, नवज्योत कौर, शर्मिला देवी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manpreet, rani to lead india hockey team