मनू भाकरचा विश्वकरंडकात 'सुवर्ण'नेम

Manu Bhakar win a gold medal in ISSF World Cup Final
Manu Bhakar win a gold medal in ISSF World Cup Final

बीजिंग : भारताची नेमबाज मनू भाकरने नेमबाजी विश्वकरंडकात सुवर्ण पदक पटकाविले आहे. तिने 10 मी पिस्तूल प्रकारात 244.7 गुण कमावत ही कामगिरी केली. 

मनू भाकरने सुवर्ण पदक पटकावत विक्रमी कामगिरी केली आहे. नेमबाजी विश्वकरंडाकाच्या अंतिम टप्प्यातील हे भारताचे पहिले सुवर्ण पदक आहे. तसेच या सुवर्ण पदकासह तिने यापूर्वीचा विश्वविक्रम मोडला आहे. 

नेमबाजी विश्वकरंडकाच्या अंतिम टप्प्यात जिंकणारी ती भारताची केवळ दुसरी नेमबाज ठरली आहे. यापूर्वी हिना सिंधूने नेमबाजी विश्वकरंडकाच्या अंतिम टप्प्यात विजय मिळवला होता. टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक 2020साठी ती यापूर्वीच पात्र ठरली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com