मनू भाकरचा सुवर्णपंच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

मुंबई - मनू भाकर आणि अनमोल जैनने जागतिक कुमार नेमबाजी स्पर्धेच्या १० मीटर पिस्तूलच्या मिश्र दुहेरीत सहजपणे सुवर्णपदकाचा वेध घेतला. या स्पर्धेतील तिसरे आणि या महिन्यातील पाचवे सुवर्णपदक जिंकणारी मनू आणि अनमोलने प्राथमिक फेरीत जागतिक विक्रमच केला.

मुंबई - मनू भाकर आणि अनमोल जैनने जागतिक कुमार नेमबाजी स्पर्धेच्या १० मीटर पिस्तूलच्या मिश्र दुहेरीत सहजपणे सुवर्णपदकाचा वेध घेतला. या स्पर्धेतील तिसरे आणि या महिन्यातील पाचवे सुवर्णपदक जिंकणारी मनू आणि अनमोलने प्राथमिक फेरीत जागतिक विक्रमच केला.

सिडनीत सुरू असलेल्या या स्पर्धेत १९ वर्षीय अनमोल आणि १६ वर्षीय मनूने प्रतिस्पर्ध्यांना नजीकही येण्याची संधी दिली नाही. ते अंतिम फेरीत ४७८.९ गुणांचा वेध घेत असताना चीनची जोडी ४७३.३ गुणच मिळवू शकली. मनू-अनमोलला अंतिम फेरीतील जागतिक विक्रम १.८ गुणाने हुकल्याची हुरहूर असेल; मात्र त्यांनी पात्रता फेरीत ७७० गुण नोंदवीत जागतिक कुमार गटाचा विक्रम केला होता. 

अनमोल-मनूने अंतिम फेरीच्या प्रत्येक टप्प्यात वर्चस्व राखले. १०० गुणांच्या पहिल्या फैरीत ३.९ गुणांची, तर अंतिम फेरीच्या पहिल्या टप्प्याअखेर ४.४ गुणांची आघाडी घेतली होती. गौरव राणा आणि महिमा अगरवाल ही दुसरी भारतीय जोडी पात्रतेत तिसरी होती; पण ते ब्राँझच्या पात्रतेपासून ०.८ गुणांनी दूर राहिले. 

स्कीटमध्येही ब्राँझपदकाचा वेध
गानेमात शेखॉन हिला महिलांच्या ट्रॅपमध्ये ब्राँझ
पात्रतेत १०२ गुणांसह पाचवी 
अंतिम फेरीत प्रगती करीत ३६ गुणांसह ब्राँझपदकांचा वेध
श्रेया अगरवाल-अर्जुन बबुताचे १० मीटर एअर रायफलच्या मिश्र प्रकारात ब्राँझ
१० शॉट्‌स असताना रौप्यपदकाची संधी होती; पण अखेर ०.९ गुणांनी दुसरा क्रमांक दुरावला
भारतीय जोडीचा ४३२.८ गुणांचा वेध
एलावेनिल-कृष्णा प्रसाद या भारतीय जोडीस २.७ गुणांनी मागे टाकले

Web Title: manu bhakar World Kumar Shooting Championship