संजीवनी,मोनिकासह प्रगती,सुनील पावराला सुवर्ण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

नाशिक : नाशिक जिल्हा ऍथलेटिक्‍स असोसिएशन आणि महाराष्ट्र ऍथलेटिक्‍स असोसिएशनच्या परवानगीने  येथील विभागीय क्रीडासंकुलात आजपासून सुरु झालेल्या राज्य अॅथलेटिक्स स्पर्धेत यजमान नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव,मोनिका आथरे यांच्यासह प्रगती मुळाणे,सुनिल पावरा यांनी आपआपल्या गटात वर्चस्व राखत सुवर्णपदकाची कमाई केली.

नाशिक : नाशिक जिल्हा ऍथलेटिक्‍स असोसिएशन आणि महाराष्ट्र ऍथलेटिक्‍स असोसिएशनच्या परवानगीने  येथील विभागीय क्रीडासंकुलात आजपासून सुरु झालेल्या राज्य अॅथलेटिक्स स्पर्धेत यजमान नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव,मोनिका आथरे यांच्यासह प्रगती मुळाणे,सुनिल पावरा यांनी आपआपल्या गटात वर्चस्व राखत सुवर्णपदकाची कमाई केली.
    विक्रांत हैप्पी होमचे संचालक गंगाधर जाधव, नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, महाराष्ट्र ऍथलेटिक्‍स असोसिएशनचे सरचिटणीस सतीश उच्छिल, महाराष्ट्र ऍथलेटिक्‍स असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि नाशिक जिल्हा ऍथलेटिक्‍स असोसिएशनचे चेअरमन हेमंत पांडे, सचिव राजीव जोशी, नाशिक ऍथलेटिक्‍स असोसिएशनचे संचालक राजेंद्र ठाकरे, आनंद खरे, आदींच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.

गंगाधर जाधव म्हणाले,गेल्या - वर्षांपासून नाशिकमध्ये ऍथलेटिक्‍स या खेळाच्या उत्तरोत्तर प्रगतीच्या दृष्टीकोनातून चांगल्या प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळेच नाशिकमध्ये कविता राऊतसारखे ऑलिंपियन खेळाडू आणि संजिवनी जाधव, मोनिका आथरे, किशन तडवी यासारखे आंतरराष्ट्रीय पदक मिळविणारे खेळाडू तयार होत आहेत. या खेळाडूंच्या प्रगतीमुळे नाशिक हे या खेळाचे माहेरघर बनले आहे. यावेळी क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी शुभेच्छा दिल्या. 

नाशिककरांचा दबदबा कायम
   महिलांच्या पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत नाशिकच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवला. पाहिले तीनही क्रमांक नाशिकला मिळाले. आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू संजीवनी जाधव हिने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करून ही स्पर्धा 16 .22 .84 मिनिटात पूर्ण करून सुवर्ण पदक मिळविले, नाशिकच्याच मोनिका आथरे (16.55 .23 मी ) हिने द्वितीय स्थान तर आरती पाटील हिने17.03 .40 मिनीट वेळ देऊन तिसरे स्थान पटकावत या प्रकारात नाशिकचे निर्वीवाद वर्चस्व सिद्ध केले. तर ज्युनियर मुलीच्या मीटर धावण्याच्या प्रकारातही नाशिकच्या प्रगती मुळाणे हिने 10.45 .44 मिनिटे अशी वेळ देत सुवर्णपदक पटकावले. तर ज्युनियर मुलांच्या भालाफेक या प्रकारात नाशिकच्या जीवन नूंदावा याने 55.56 मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले. तसेच पोल व्हॉल्ट अगदी उंच झेप घ्यावी लागणाऱ्या या प्रकारातही ज्युनियर मुलांच्या गटात नाशिकच्या सुनील पावरा याने सुवर्णपदक पटकावले. 
 

सुमित पाटीलला सुवर्ण
पुरुषांच्या मीटर धावण्याच्या स्पर्धेत मुंबई शहरच्या सुमीत पाटीलने सुवर्णपदक मिळविले. तर लांब उडीत रायगडच्या अभिषेक पाटील याने प्रथम क्रमांक मिळविला. महिलांच्या मीटर अडथळ्याच्या शर्यतीत पुण्याच्या अंकिता गोसावीने सुवर्णपदक पटकावले तर ज्यूनीयर मुलीमध्ये मीटर अडथळा शर्यतीत ठाण्याच्या मिन्टविली फर्नांडीसने सुवर्णपदक मिळविले, तर तिचीच जोडीदार मिकांनी रॉड्रिक्‍स हिने रजत पदक पटकावले. उद्या(ता.2) सकाळी . पासून स्पर्धेला सुरवात होणार असून सायंकाळी या स्पर्धेची सांगता होणार आहे अशी माहिती राजीव जोशी यांनी दिली.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्हा ऍथलेटिकस असोसिएशनचे चेअरमन हेंमंत पांडे आणि सरचिटणीस राजीव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता जाधव, वैजनाथ काळे, बाळासाहेब शिरफ़ुले, अविनाश पगारे, दत्ता बोरसे, मीनाक्षी जाधव, सचिन कडरे, प्रतीक भोगले, तन्मय पवार, विजय साळवे, भाग्येश साखला आदी मेहनत घेत आहेत. 
 

Web Title: marathi news athletics competition