परदेशातील विकेट्‌सचा भारतीय फिरकीचा विक्रम 

Kuldeep Yadav Yuzvendra Chahal
Kuldeep Yadav Yuzvendra Chahal

नवी दिल्ली : वेगवान गोलंदाजांना पोषक असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर आपल्या फिरकीचा दरारा निर्माण करणाऱ्या युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी परदेशात एका मालिकेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम केला. 

या दोघांनी 1998-99 मध्ये वेस्ट इंडीजच्या किथ आर्थरटन याचा 12 गडी बाद करण्याचा विक्रम मोडला. प्रथम युजवेंद्रने दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरला बाद करताना आर्थरटनला मागे टाकले. त्यानंतर कुलदीपने 57 धावांत 4 गडी बाद करताना ही कामगिरी केली. आता मालिकेत कुलदीपने सर्वाधिक 16 गडी बाद केले आहेत. 

चहलने या मालिकेत 45 धावांत 2 गडी बाद करून सुरवात केली. त्यानंतर 22 धावांत 5, 46 धावांत 4 आणि 43 धावांत 2 गडी, असे एकूण 13 गडी बाद केले. कुलदीपने पाचव्या सामन्यात 4 गडी बाद करून चहलला मागे टाकले. 

या तीन गोलंदाजांनंतर ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नचा क्रमांक येतो. त्याने 1993-94च्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच 11 आणि 1996-97 मध्ये 10 गडी बाद केले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंत इंग्लंडच्या कबीर अलीने 13, ऑस्ट्रेलियाच्या मिशेल जॉन्सनने 13, जेसन गिलेस्पीने 12, डॅरेन गॉफने 11 गडी बाद केले होते. गॉफने अशी कामगिरी तीन वेळा केली आहे. 

दरारा भारतीय फिरकीचा 

  • दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत आतापर्यंत 30 बळी (अजून एक सामना बाकी) 
  • यापूर्वी इंग्लंडविरुद्ध सहा सामन्यांत 2006 मध्ये 27 विकेट्‌स 
  • या खेरीज इंग्लंडमधील 2011च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत 34 विकेट्‌स 
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कुलदीपच्या सर्वाधिक 16 विकेट्‌स, यापूर्वी मुरलीधरनच्या 14

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com