"गोल्डमॅन' दत्तू भोकनळच्या गावात दिवाळी साजरी 

भाऊसाहेब गोसावी
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

तळेगाव रोही (जि. नाशिक) ः जकार्तामधील आशियाई क्रीडा स्पर्धेत रोईंग क्वाडरपल गटात भारताला सुवर्णपदकाची कमाई करुन देणाऱ्या संघातील रोईंगपटू "गोल्डमॅन' दत्तू भोकनळच्या चांदवड तालुक्‍यातील त्याच्या घरी अन्‌ गावात आज दिवाळी साजरी झाली.

दत्तूचा समावेश असलेल्या संघाने सुवर्णयश मिळाल्याची माहिती दूरध्वनीवरुन कुटुंबात पोचली अन्‌ कुटुंबियांसमवेत तळेगाव रोहीकरांनी एकच जल्लोष केला. गावात फटाक्‍यांची आतषबाजी करत पेढ्यांचे वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

तळेगाव रोही (जि. नाशिक) ः जकार्तामधील आशियाई क्रीडा स्पर्धेत रोईंग क्वाडरपल गटात भारताला सुवर्णपदकाची कमाई करुन देणाऱ्या संघातील रोईंगपटू "गोल्डमॅन' दत्तू भोकनळच्या चांदवड तालुक्‍यातील त्याच्या घरी अन्‌ गावात आज दिवाळी साजरी झाली.

दत्तूचा समावेश असलेल्या संघाने सुवर्णयश मिळाल्याची माहिती दूरध्वनीवरुन कुटुंबात पोचली अन्‌ कुटुंबियांसमवेत तळेगाव रोहीकरांनी एकच जल्लोष केला. गावात फटाक्‍यांची आतषबाजी करत पेढ्यांचे वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

दत्तूच्या यशाच्या आनंदोत्सवासाठी अख्खं गाव जमले होतं. दिवंगत वडील बबन भोकनळ यांचे स्वप्न दत्तूने साकार केल्याचा आनंद एकीकडे होताच, पण त्याचवेळी दत्तूच्या वडिलांप्रमाणेच आई आशाबाई, आजी विठाबाई हयात नसल्याचे शल्य कुटुंबियांच्या चेहऱ्यावर लपत नव्हते. दत्तूने देशासाठी सुवर्णपदकाची कमाई केली. त्याच्या यशाचा आम्हाला खूप अभिमान असून त्याने आशियाई स्पर्धेत देशाची मान उंचावली अशी प्रतिक्रिया दत्तूचे आजोबा रामदास भोकनळ यांनी व्यक्त केली. 

दत्तूची सुवर्णपदकासह प्रतीक्षा 
दुष्काळी चांदवड तालुक्‍यातील पाच हजार लोकसंख्येचं तळेगाव रोही हे गाव. आपल्या दत्तूला "मेडल मिळालं' असं प्रत्येक जण सांगत होता. गावातील कुणीही कधी "मेडल' पाहिलेलं नाही. त्यामुळे दत्तूच्या सुवर्णपदकाचं साऱ्यांना अप्रूप आहे. आमच्या गावचे भूषण दत्तूने सुवर्णपदकाची कमाई केली. आमच्या दुष्काळी गावाचे नाव जगाच्या नकाशावर कोरले, याचा अभिमान आम्हाला आहे, असे प्रत्येक जण म्हणत होता. गावात घराघरामध्ये आनंदाचे वातावरण असून सणासुदीप्रमाणे घरांमध्ये मिष्टान्न भोजनाचा बेत करण्यात आला आहे. अख्खं गाव दत्तूच्या आपल्या गावी येण्याची वाट पाहत आहे. ग्रामस्थ सुवर्णपदासह दत्तूला पाहण्यासाठी आतूर झाले आहेत. 

 तापानं फणफणला...
आशियाई क्रिडा स्पर्धांमध्ये दत्तु पदकाची कमाई करणारच हा त्याच्या कुटूंबीयांना विश्वास होता.मात्र काल सायंका। पर्यंत दत्तुला पदक मिळत नसल्याने कुटूंबीय नाराज होते.काल सायंकाळी दत्तु बरोबर त्याचे काका बाळासाहेब भोकनळ यांचे बोलणे झाले.तेव्हा दत्तुची तब्बेत बरी नसल्याचे त्याने सांगितले. काल सायंकाळी तापाने फणफणलेल्या दत्तुने मी पदकाची कमाई करेल असा आत्मविश्वास त्याने कुटूबीयांना दिला होता. हाच आत्मविश्‍वास त्याने सार्थ केल्याने कुटुंबियांच्या आनंदाला उधाण आले होते. 

""दत्तू देशाबाहेरील आतंरराष्ट्रीय स्पर्धांसाठी जाते, त्यावेळी त्याला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यात आर्थिक अडचणींचाही समावेश असतो. अशावेळी त्याला घरातून पैसे द्यावे लागतात. त्याची ही आर्थिक अडचण सरकारने देशाबाहेरील स्पर्धांवेळी दूर करायला हवी.'' 
- बाळासाहेब भोकनळ (दत्तूचे काका) 

""आशियाई क्रीडा स्पर्धेत दत्तूने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. आमच्या कुटुंबियांचे स्वप्न साकार झाले आहे. दत्तू देशाला ऑलिम्पिक स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवून देईल असा विश्‍वास आम्हाला वाटतो आहे.'' 
- गोकुळ बबन भोकनळ (दत्तुचा भाऊ) 

""देशासाठीच्या दत्तू भोकनळच्या कामगिरीचा आम्हा ग्रामस्थांना मोठा अभिमान वाटतो आहे. आमच्या गावाचे नाव त्याने साता-समुद्रापलिकडे पोचवल्याने त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. 
- साधना भोकनळ (तळेगाव रोहीच्या सरपंच) 

Web Title: marathi news dattu bhoknal village