नाशिकमध्ये आज जेके टायर मान्सून रॅलीचा थरार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

नाशिक:  जेके टायर २९वी मान्सून रॅली चा आज नाशिक येथील विल्होळी जवळील जैन मंदिर जवळ होत आहे. नाशिक करांबरोबरच अवघ्या क्रीडा जगताचे लक्ष या स्पर्धेकडे लागून आहे . 

   या स्पर्धेत एकूण ४१ स्पर्धकांनी आपला सहभाग निश्चित केला असून प्रियांका सिंग मुंबई या महिलेने सुद्धा आपला प्रवेश निश्चित केला आहे . काल  या वाहनांची वाहन तपासणी हॉटेल संजीवनी रिसॉर्ट  येथे पार पडली . रवींद्र वाघचौरे व सुजित काळशीकर  यांनी हि वाहन तपासणी केली . यावेळी फेडरेशनचे मनीष चिटको , रवी शामदासांनी,बोंबिली विजयकुमार  हे उपस्थित होते . 

  काल स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना रॅलीचा मार्ग दाखवण्यात आला  . त्यानंतर स्पर्धकांची बैठक घेऊन त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली. या स्पर्धेसाठी ५ किमी चे तीन या प्रमाणे एकूण १५ किमी अंतर हे स्पर्धात्मक असणार आहे . त्या ठिकाणी काही अंतरावर  रेडिओ हॅम , डॉक्टर , ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे . डॉ. राकेश खैरनार हे त्यांच्या मेडिकल टीम बरोबर या स्पर्धेसाठी  वैद्यकीय सेवा पुरवली जाणार आहे . सकाळी ९. ०० वाजता या स्पर्धेचा  शुभारंभ होऊन दुपारी  साधारण ३ वाजता पारितोषिक वितरण समारंभ   हॉटेल संजीवनी रिसॉर्ट   येथे होणार आहे . 

Web Title: marathi news jk tyers moonson rally