नियमित सराव,अनुभवामुळे टेबल टेनिसमध्ये भारतीयाचा दबदबा-कमलेश मेहता 

residentional photo
residentional photo

नाशिक : जागतिक अजिंक्‍यपद, आशियाई किंवा राष्ट्रकुल स्पर्धा असो, अशा सर्वच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय चांगल्या खेळामुळे आपली छाप पाडत आहे. याच्यांमागे नियमित सराव व अनुभव देखील महत्वाचा मानला जात आहे. भारतीय खेळाडूंचे मानांकन सुधारते आहे. ही चांगली बाब असून जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत( वर्ल्ड चॅम्पियनशिप)अव्वल सोळामध्ये भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. भारतीयांचा हा दबदबा असाच टिकून राहील, यात शंका नाही,असे मत अर्जुन पुरस्कार विजेते कमलेश मेहता यांनी "सकाळ'शी बोलतांना व्यक्‍त केले. 

तिसऱ्या राज्य मानांकन अजिंक्‍यपद टेबल टेनीस स्पर्धेच्या उद्‌घाटनानंतर श्री.मेहता नाशिकला आले होते. त्यावेळी त्यांची भेट घेतली असता श्री.मेहता यांनी "सकाळ'शी विविध बाबींवर संवाद साधला. खेळातील आकर्षण वाढावे, क्रीडा प्रेमी आकर्षित व्हावेत यासाठी टेबल टेनीस खेळातही अमुलाग्र बदल होत असल्याचे त्यांनी नमुद केले.

श्री.मेहता म्हणाले, एकंदरीत टेबल टेनीस खेळासाठी सध्या चांगले दिवस आहेत.जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत( वर्ल्ड चॅम्पियनमध्ये) महिला व पुरूष दोन्ही गटात भारताची चांगली कामगिरी राहिली आहे. अत्यंत कठीण अशा आशियाई स्पर्धेतही अव्वल आठमध्ये खेळाडूंनी मजल मारली तर राष्ट्रकुल स्पर्धेत तीन सूवर्ण, एक रौप्य व चार कांस्य असे एकूण आठ पदके जिंकली. या स्पर्धेत दहा पैकी तीन खेळाडू महाराष्ट्रातील असल्याने, राज्याची कामगिरी अव्वल राहिली आहे. ऑलिंम्पिक स्पर्धेत भारताला पदक कधी मिळेल, हे कुणीही सांगू शकत नाही. पण आशावादी परीस्थिती पाहता आगामी काळात पदकाची अपेक्षा ठेवणेही चुकीचे ठरणार नाही. 

उदयोन्मुख खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष 
कनिष्ठ गटांमध्येही खेळाडू अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करताय. मानव ठक्‍कर याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानापर्यंत मजल मारली आहे. सध्या तो तिसऱ्या क्रमांकावर असला तरी त्याच्याकडून खुप अपेक्षा आहेत. मुलींमध्ये दिया चितटे हिने जागतिक क्रमवारीत चौथे स्थान मिळविलेले आहे तर वरीष्ठ गटामध्ये शरद कमल (33 वा क्रमांक), सत्यन, मनवी या खेळाडूंचीही कामगिरी कौतुकास्पद आहे, असे श्री.मेहता म्हणाले. 

सुरवातीला खर्च अन्‌ मेहनतीची हवी तयारी 
सध्या खेळाडूंना भरपुर संधी मिळत असल्याने स्वखर्चाने परदेशातील स्पर्धांमध्ये खेळाडू सहभागी होत आहे. प्रशिक्षण घेत आहे. यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अचूक अंदाज येतोय. खेळात यशस्वी होण्यासाठी सुरवातीला खर्च करण्याची तसेच मेहनतीची तयारी असणे आवश्‍यक आहे. खेळ दिसल्यास पुढे विविध स्तरांवर आधार मिळू शकतो. 

"11 स्पोर्टस्‌'च्या माध्यमातून खेळात रंजकता आणण्याचा प्रयत्न 
नीरज बजाज, विता दानी या दिग्गजांच्या माध्यमातून "11 स्पोर्टस्‌'द्वारे कॉर्पोरेटचा प्रवेश झाल्याने टेबल टेनीसला आणखी ऊर्जा मिळालेली आहे. कॉर्पोरेट प्रोफेशनल लिगद्वारे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंना खेळविले जात असल्याने भारतीय खेळाडूंचा दर्जा सुधरविण्यास मदत होतेय. रंजकता वाढविण्यासाठी बॉलचा आकार, रंगात बदल केला. लाईटींग पद्धती बदलली. 21 पॉंईंटचा गेम 11 पॉंईंटवर आणला. अशा विविध प्रयोगांना क्रीडा प्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी नमुद केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com