रोज थोडा वेळ तरी खेळण्याचे पंतप्रधानांचे आवाहन 

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : खेळ आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक व्हायला हवा. प्रत्येकाने रोज आपल्या दिवसातील काही वेळ तरी खेळायला हवे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटन करताना खेले भी, खिले भी असाच जणू मंत्र दिला. 

नवी दिल्ली : खेळ आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक व्हायला हवा. प्रत्येकाने रोज आपल्या दिवसातील काही वेळ तरी खेळायला हवे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटन करताना खेले भी, खिले भी असाच जणू मंत्र दिला. 

खेलो इंडियाच्या निमित्ताने देशातील क्रीडा गुणवत्तेस ओळखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यानिमित्ताने अनेक दिग्गज क्रीडापटू या वेळी उपस्थित होते. त्या वेळी मोदी म्हणाले. प्रत्येकाने रोज थोडा वेळ तरी खेळायला हवे. आत्ता आपण अनेक दिग्गज खेळाडूंसोबत आहोत. त्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला, पण हार मानली नाही आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. खेले भी, खिले भी हा आपला संकल्प असायला हवा. खेलो इंडिया हा कार्यक्रम नव्हे तर मोहीम असायला हवी. मैदानात खेळ खेळण्याचे पुनरुज्जीवन व्हायला हवे. त्यासाठी एक योजनाबद्ध कार्यक्रम तयार करण्यात येईल. भारतास जागतिक क्रीडा क्षेत्रात एक ताकद करण्याचा आपला प्रयत्न हवा. Narendra Modi at the launching of Khelo India

भारतात गुणवान क्रीडापटूंची वानवा नाही. आपला देश युवा आहे. आपण खेळात नक्कीच प्रगती करु शकतो. आपले खेळाडूही वेगळी ओळख निर्माण करीत आहेत. ग्रामीण तसेच छोट्या शहरातील मुलांची खेळातील प्रगती सुखावणारी आहे. त्यांना प्रोत्साहीत करायला हवे. खेळणाऱ्या तसेच त्याला साथ देणाऱ्या प्रत्येकास आपण मदत करायला हवी. क्रीडा मैदानावर उंचावणारा तिरंगा हा प्रत्येकाचा आत्मविश्‍वास उंचावतो, असेही पंतप्रधानांनी सांगितले. Narendra Modi At launching of Khelo India

क्रीडा मंत्रालय प्रत्येक वर्षी एक हजार गुणवान क्रीडापटूंची निवड करणार आहे. त्यांना जागतिक विजेते होण्यासाठी आर्थिक साह्य केले जाणार असल्याचे क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांनी सांगितले. 8 फेब्रुवारीपर्यंत दिल्लीत होणाऱ्या या क्रीडा महोत्सवात 17 वर्षांखालील मुले - मुली 16 क्रीडा प्रकारांत आपले कौशल्य दाखवतील. 

Web Title: marathi news Khelo India Narendra Modi Rajyavardhan Singh Rathore