'खेलो इंडिया'त ताई बाह्मने, अवंतिकाची 'सुवर्ण' धाव  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : भविष्यातील आशास्थान असलेल्या नाशिकच्या ताई बाह्मनेने नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या पहिल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत ऍथलेटिक्‍समधील आठशे मीटर शर्यतीत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. ऍथलेटिक्‍समध्ये महाराष्ट्राचे हे दुसरे सुवर्णपदक होय. पुण्याची अवंतिका नराळे ही स्पर्धेतील वेगवान धावपटू ठरली. 

कविता राऊत, संजीवनी जाधव यांचे प्रशिक्षक विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या ताईने 2 मिनिटे 13.37 सेकंदात शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले. या शर्यतीत महाराष्ट्राची दुसरी धावपटू संगीता शिंदेला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

सप्टेंबर महिन्यात पश्‍चिम विभागीय स्पर्धेच्या वेळी स्नायू दुखावल्यानंतर ताईने पुनरागमन करताना ज्युनिअर राष्ट्रीय व राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. दोनशे मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकणाऱ्या करन हेगिस्तेला शंभर मीटर शर्यतीत चुकीचा प्रारंभ केल्याने अपात्र ठरविण्यात आले. 

मुलींच्या शंभर मीटर शर्यतीत पुण्याच्या अवंतिका नराळेने शंभर मीटर शर्यत जिंकून वेगवान धावपटूचा किताब मिळविला. तिने 12.36 सेकंद या वेगवान वेळेसह शर्यत जिंकली. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात भोपाळ येथे झालेल्या शालेय मैदानी स्पर्धेतील कामगिरीने तिची या स्पर्धेसाठी निवड झाली होती. ती पुण्यातील वडगाव शेरी येथील लोणकर माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. मुलींच्या 100 हर्डल्स शर्यतीत महाराष्ट्राच्या मिशेल फर्नांडिसला पाचवे व प्रांजली पाटीलला सहावे स्थान मिळाले. 

कविता राऊतला अर्जुन पुरस्कार मिळाल्यावर मला तिचे 'द्रोणाचार्य' म्हणून ओळख मिळू लागली. अर्थात, मी कधीही पुरस्काराची अपेक्षा केली नाही. कविता काय किंवा ताई काय जेव्हा माझे शिष्य ट्रॅकवर उतरून पदक मिळवितात तेव्हा मला त्यांचा अभिमान वाटतो. 
- विजेंदर सिंग, ताईचे प्रशिक्षक

Web Title: marathi news Khelo India sports Athletics Avantika Narale Tai Bahmane