नेमबाजीत शाहूला सुवर्ण, नंदिताला रौप्यपदक

वृत्तसंस्था
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : खेलो इंडियाच्या नेमबाजी प्रकारात महाराष्ट्राच्या युवा नेमबाजांनी छाप पाडली. मुलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात कोल्हापूरच्या शाहू माने याने 247.7 गुणांसह सुवर्णपदकाची कमाई केली. मुलींमध्ये पुण्याची नंदिता सुळ (249.3) रौप्यपदकाची मानकरी ठरली. 

मुलांच्या गटात 17 वर्षांखालील गटात अव्वल असणाऱ्या गुवाहटीच्या हृदय हजारिका आणि जयपूरच्या यशवर्धन यांनी पात्रता फेरीत अनुक्रमे 624.3 आणि 623.9 गुणांची कमाई करून राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. त्यानंतरही ते पदकापर्यंच पोचू शकले नाहीत.

गेल्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळविणारा जयपूरचा दिव्यांश पन्वरही अपयशी ठरला. सहाव्या क्रमांकाने पात्र ठरलेला कोल्हापूरचा शाहू माने (621.4) अंतिम फेरीत सरस ठरला. पहिल्या पाच फैरीतच त्याने आपले वर्चस्व सिद्ध केली. यापूर्वी युवा ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या शाहूची अचूकता कमालीची होती. त्याने 247.7 गुणांसह सुवर्णपदक मिळविले. 

मुलींच्या विभागात चंडिगडची झीना कायम आघाडीवर होती. नंदिताने 17 आणि 18व्या फेरीत 10.4 आणि 10.8 गुणांचा वेध घेत मध्य प्रदेशाच्या याना राठोडला पिछाडीवर टाकत दुसरे स्थान मिळविले. मात्र, तीला (51.6) झीनाला (53.3) गाठणे शक्‍य झाले नाही. 

पात्रता फेरीतील कामगिरीने निराश झालो होतो. अंतिम फेरीपूर्वी प्रशिक्षकांनी दिलेल्या टिप्स महत्त्वपूर्ण ठरल्या. 
- शाहू माने

Web Title: marathi news Khelo India sports Shahu Mane Nandita Sul Shooting