वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व 

वृत्तसंस्था
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या वेटलिफ्टिंग खेळाडूंनी मंगळवारी पदकांचा भार लीलया उचलला. स्पर्धेच्या सातव्या दिवशी तृप्ती माने आणि जेर्मी लालरिंनुन्गा यांनी मिळविलेल्या सुवर्णपदकासह एकूण दहा पदके मिळविली. महाराष्ट्राला पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर आणताना ज्युदोपटूंनी साथ केली. ज्युदोमध्ये एका सुवर्णपदकासह एकूण पाच पदके महाराष्ट्राने मिळविली. 

वेटलिफ्टिंगमघ्ये महाराष्ट्राचे वर्चस्व राहिले. मूळचा मणिपूरचा पण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युवा जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या जेर्मी लालरिंनुन्गा याने आज 62 किलो वजनी गटात (115 किलो स्नॅच आणि 136 किलो क्‍लीन अँड जर्क) 251 किलो वजनी उचलून सुवर्णपदकाची कमाई केली. त्याला महाराष्ट्राच्याच जेकब वॅनल्टात्लुन्गा याचे आव्हान होते. पण, जेर्मी आणि जेकब दोघेही क्‍लीन अँड जर्क प्रकारात अखेरच्या प्रयत्नात अपयशी ठरले. जेकब 247 किलो वजन उचलून रौप्यपदकाचा मानकरी ठरला. ब्रॉंझपदकही महाराष्ट्राच्या अभिषेक निपाणे याने मिळविले. 

महाराष्ट्राच्या तृप्ती माने हिने 58 किलो वजनी गटात 172 किलो वजन उचलून सुवर्ण, तर पूजा परदेशीने 147 किलो वजन उचलून ब्रॉंझपदक मिळविले. मुलींच्याच 53 किलो वजनी गटात युवा राष्ट्रकुल अजिंक्‍यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्राच्या अनन्या पाटीलला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने 149 किलो वजन उचलले. मणिपूरची लामाबाम निलम देवी (159 किलो) सुवर्णपदकाची मानकरी ठरली. याच वजनी गटात महाराष्ट्राची धनश्री पवार ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली. 

63 किलो मुली : प्राजक्ता साळुंके (रौप्य, 63 किलो) 

महाराष्ट्र पुन्हा दुसऱ्या स्थानी 
वेटलिफ्टिंग आणि ज्यूदो मधील घवघवीत यशाने महाराष्ट्र पदकतालिकेत पुन्हा दुसऱ्या स्थानी आले आहे. महाराष्ट्राने 19 सुवर्ण, 22 रौप्य आणि 27 ब्रॉंझ अशी एकूण 68 पदके मिळविली आहेत. हरियाना (22+16+19=57) सर्वाधिक सुवर्णपदकाच्या आधारे आघाडीवर असून, दिल्ली (19+20+26=65) तिसऱ्या स्थानावर घसरले आहे.

Web Title: marathi news Khelo India sports Weightlifting Maharashtra