सामन्यात व्यत्यय आणत खो-खो सचिवांचा वाढदिवस,हे वागणं बरं नव्हे...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

नाशिकः महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे सांगली येथे नुकतीच किशोर-किशोरी गटाच्या निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धा झाली. ही स्पर्धा मैदानावरील खेळाबरोबरच राज्य संघटनेचे सचिव प्रा.डॉ.चंद्रजीत जाधव यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याने गाजली.सामने ऐन रंगात आल्यानंतर ते मध्येच थांबवून अभिष्टचिंतन सोहळ्याचा घाट घालण्यात आला आणि निष्ठा व्यक्त करण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न अवर्णनीय असाच होता...या सर्व सोहळ्याचे साक्षीदार अर्थात 22 जिल्ह्यातील 44 संघाचे खेळाडू,प्रशिक्षक,संघटक होते..राज्य खो-खो संघटनेचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री मा.

नाशिकः महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे सांगली येथे नुकतीच किशोर-किशोरी गटाच्या निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धा झाली. ही स्पर्धा मैदानावरील खेळाबरोबरच राज्य संघटनेचे सचिव प्रा.डॉ.चंद्रजीत जाधव यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याने गाजली.सामने ऐन रंगात आल्यानंतर ते मध्येच थांबवून अभिष्टचिंतन सोहळ्याचा घाट घालण्यात आला आणि निष्ठा व्यक्त करण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न अवर्णनीय असाच होता...या सर्व सोहळ्याचे साक्षीदार अर्थात 22 जिल्ह्यातील 44 संघाचे खेळाडू,प्रशिक्षक,संघटक होते..राज्य खो-खो संघटनेचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री मा. आमदार अजित पवार आपल्या या सहकाऱ्याच्या कृतीबद्दल कधीतरी जाब विचारणार आहेत  कि नाही . याचीच चर्चा सगळीकडे होती. हे लोन इतर खेळांमध्येही पोहचायला फार वेळ लागणार नाही . तेव्हा महाराष्ट्र ऑलॉम्पिक असो. अध्यक्ष अजित पवार आपल्या सर्व खेळातील सहकाऱ्यांना देतात का हाच खरा प्रश्न क्रीडा रसिकांपुढे उभा आहे . 
    या सोहळ्याबद्दल कुणाला आक्षेप असल्याचेही कारणही नव्हते, फक्त ऐन सामने थांबवून सोहळा घेण्याचा जो अट्टाहास दिसला तो  चूकीचा वाटला. त्याबद्दल नाराजीचा सूर उमटला. राज्य खो-खो संघटनेने भविष्यात तरी असा व्यत्यय आणत सोहळे साजरे करणे टाळावे, ही अपेक्षा व्यक्त होत आहे. नाशिक जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले यांनीही आपल्या पत्रातून नाराजी व्यक्त केली.
 स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचे आठ सामने होणार होते , पहिले दोन सामने सुरुअसतांना पुढच्या दोन सामन्यासाठी संघाना सामन्याच्या तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या. पण पहिले दोन सामने झाल्यानंतर अचानक पुढील सामन्यासाठी सज्ज असलेल्या स्पर्धक संघाना पुढील सूचना येई पर्यंत थांबविण्यात आले आणि सचिवांचा कौतुक सोहळा सुरु झाला. हक्काचा असा प्रेक्षक समोर बळजबरीने बसवल्यानंतर व्यासपीठावर सोहळा सुरु झाला 
किती वर्णावे गुणगान आणि निष्ठाही
व्यासपीठावरून श्री.जाधव त्यांच्या कार्याचे गोडवे गाणे सुरु झाले . सर्व प्रथम सुवासिनीच्या हस्ते त्यांचे औक्षण, त्यानंतर उत्सवमूर्तीना फेटा बांधला. आणि नंतर त्यांच्या कार्याची महती सांगण्याची स्पर्धाच सुरु झाली . काही वक्‍त्यांना शब्द सुचत नव्हते  तर काही वक्ते भांबावून गेले होते . हा नयनरम्य सोहळा एक ते सव्वा तास चालल्यानंतर उत्सवमूर्तींनी आपले मनोगत सुरु केले , हे सारे घडत होते खो-खो च्या मैदानात, स्पर्धा खेळण्यासाठी आसुसलेल्या बारा-तेरा वर्षाच्या खेळाडूंसमोर आपण ज्यांच्या समोर आपले मनोगत व्यक्त केले.
 

मिठाई,बिस्कीटे आणि मोतीचूरचे लाडू
वय लक्षात घेण्याची मानसिकता ना आयोजकांना मध्ये होती. ना उत्सवमूर्तीना .पूर्वीच्या काळी व आज हि आपल्या वाढदिवसानिमित्त जनतेला मिठाई वाटत असे. या छोट्या प्रत्येक खेळाडूंना दिले गेले. ते बिस्कीटचे पुडे मात्र 3-4- वर्षांपूर्वी स्थळ सांगलीच स्पर्धा वी किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धा वेळ हिच  त्या वेळेस उत्सवमूर्तीना ढोल ताशे सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरांमध्ये मिरवणुकीद्वारे व्यासपीठावर आणण्यात आले , त्या वेळेस सुद्धा असाच एक दीड तासाचा सोहळा मात्र त्या वेळेस संपूर्ण भारतातून आलेले छोटे खेळाडू हे जास्त नशीबवान होते. त्यांना प्रत्येकाला मोतीचुराचं लाडू वाटप करण्यात आले. ते भाग्य मात्र महाराष्ट्राच्या छोट्या खेळाडूंच्या नशिबी नव्हते हे मात्र खरे . 
 

बळजबरी भाषणाचे डोस
  आपला वाढदिवस स्पर्धक खेळाडूंना थांबवून त्यांना बळजबरी भाषणाचे डोस आपण या छोट्या खेळाडूंना देत आहोत. याचे कोणतेही सोयरसुतक त्यांच्या वागणुकीतून दिसत नव्हते . संपूर्ण देशात कॅण्डलमार्च निघत असतांना त्याच वेळेस आपले वाढदिवस सार्वजनिकरित्या अशा पद्धतीने साजरे करणे कितपत योग्य याचा विचार व्यक्ती व संघटक म्हणून श्री. जाधव हे  कधी करणार आहोत कि नाही . 
 

Web Title: marathi news kho kho assoction birth day