राज्य खो-खो संघटनेच्या निवडणुकीत सावळागोंधळ,नाशिकचा बहिष्कार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

नाशिक : महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या होऊ घातलेल्या चौ-वार्षिक निवडणुकीत उमेदवारांच्या दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. पहिल्या यादीमध्ये सरचिटणीस पदाच्या उमेदवारास कार्याध्यक्षपदाची उमेदवार घोषित केले तर त्यानंतर अवघ्या 16 तासांनी दुसऱ्यांदा पुन्हा उमेदवारांची यादी जाहीर करताना, कार्याध्यक्षपदाच्या उमेदवारास सरचिटणीसपदाचा उमेदवार दाखविण्यात आले. या सावळ्या गोंधळामुळे निवडणुक अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप निवडणुकीतील सरचिटणीस पदाचे उमेदवार मंदार देशमुख यांनी केला आहे.

या पदाची निवडणूक पुढे ढकलावी आणि निवडणुक अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणी श्री. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, या निवडणुकीवर नाशिक जिल्हा खो-खो संघटनेचे बहिष्कार टाकण्यात आला आहे. 
शिवाजी क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नाशिक जिल्हा खो-खो संघटनेचे सरचिटणीस मंदार देशमुख यांनी सांगितले की, त्यांनी राज्य खो-खो संघटनेच्या होऊ घातलेल्या चौवार्षिक निवडणुकीसाठी सरचिटणीस या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर निवडणूक अधिकारी ऍड. सुधाकर मुंडे यांनी संघटनेच्या संकेतस्थळावर गेल्या मंगळवारी (ता.14) सायंकाळी 6 वाजता निवडणुकीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली.

ज्यामध्ये श्री. देशमुख यांना कार्याध्यक्षपदाचा उमेदवार दाखविण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी (ता.15) सकाळी 10 वाजता संघटनेच्या संकेतस्थळावर पुन्हा दुरूस्ती केलेली यादी प्रसिद्ध करीत, त्यावर श्री.देशमुख यांना सरचिटणीस पदाचे उमेदवार दाखविले. निवडणूक अधिकाऱ्यांकडूनच अशाप्रकारे करण्यात आलेल्या सावळागोंधळामुळे संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे.

   , मतदारांमध्येही चुकीचा संदेश पोहोचला आहे. यातून निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. सुधाकर मुंडे पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप करीत, त्यांच्या हकालपट्टीची आणि सदरील प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सरचिटणीसपदाची निवडणूक बेमुदतपणे पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी श्री. देशमुख यांनी केली आहे. 
दरम्यान, यावेळी निवडणुकीतील सावळागोंधळामुळे नाशिक जिल्हा खो-खो संघटनेतर्फे निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्यात येत असल्याने संघटनेने जाहीर केले आहे. त्यावेळी श्री. देशमुख यांच्यासह जिल्हा संघटनेचे सहसचिव उमेश आठवणे, कार्यकारिणी सदस्य रोहिणी ढवळे उपस्थित होते. 
 
Web Title: marathi news kho kho election