सिंधू-ओकुहारा आज आमने सामने 

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

टोकियो : जागतिक अजिंक्‍यपद आणि सिंगापूर सुपर सिरीज स्पर्धेत अंतिम फेरीत समोरासमोर आलेल्या भारताची पी. व्ही. सिंधू आणि जपानची नोझोमी ओकुहारा उद्या जपान ओपन स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत समोरासमोर येणार आहेत. 

पहिल्या फेरीच्या लढतीत बुधवारी दोघींनी विजय मिळविले. अर्थात, सिंधूला जपानच्याच मिनात्सु मितानीचा पराभव करताना तीन गेमपर्यंत झुंजावे लागले. ओकुहाराने तुलनेत चीनच्या चेऊंग न्गन यी हिचे आव्हान सरळ दोन गेममध्ये संपुष्टात आणले. 

सिंधूप्रमाणे भारताच्या साईना नेहवाल हिनेही दुसरी फेरी गाठली असून, तिच्यासमोर ऑलिंपिक विजेती कॅरोलिना मरिन हिचे आव्हान राहणार आहे. साईनाने थायलंडच्या पॉर्नपावी चोचुवॉंग हिचा, तर मरिने चीनच्या चेन झिआओझिन हिचे आव्हान मोडून काढले. साईना आणि सिंधू यांची आगेकूच कायम राहिल्यास या दोघी उपांत्य फेरीत एकमेकींच्या प्रतिस्पर्धी असतील. 

दरम्यान, पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉय, समीर वर्मा, किदांबी श्रीकांत यांनी पहिल्या फेरीत विजय मिळविले. साई प्रणीत आणि सौरभ वर्मा यांना पराभवाचा सामना करावा लागला. मिश्र दुहेरीत एस. रंकीरेड्डी-अश्‍विनी पोनप्पा यांनी आगेकूच केली. मात्र, त्यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला. 

निकाल (भारतीय) 

  • दुहेरी (मिश्र) : सत्विक साईराज रंकीरेड्डी-अश्‍विनी पोनप्पा वि.वि. तिन इस्रिरानेट-पाचारापुन चोचुवॉंग 21-17, 21-13 
  • एकेरी (पुरुष) के. श्रीकांत वि.वि. तिआन होईवेई 21-15, 12-21, 21-11, लिन डॅन वि.वि. सौरभ वर्मा 11-21, 21-15, 21-13, ली डॉंग केऊन वि.वि. बी. साई प्रणित 21-23, 21-17, 21-14, एच. एस. प्रणॉय वि.वि. आंदेर्स ऍटॉन्सन 21-12, 21-14, समीर वर्मा वि.वि. खोसित फेट्राडॅब 21-12, 21-19 
  • महिला : साईना नेहवाल वि.वि. पॉर्नवी चोचुवॉंग 21-7, 21-9, पी. व्ही. सिंधू वि.वि. मिनात्सु मितानी 12-21, 21-15, 21-17.
Web Title: marathi news marathi websites sports news badminton news PV Sindhu