नाशिकमध्ये पाच,सहा जानेवारीला "नाशिक पेलेटॉन 2019' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

नाशिक : नाशिक सायकलीस्ट फाऊंडेशनतर्फे नाशिक पेलेटॉन 2019 ही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा 5 व 6 जानेवारीला विविध वयोगटात होत आहे. बुधवार (ता.5) पासून स्पर्धकांना नावनोंदणी करता येईल. स्पर्धेत एकूण पंधरा लाखांची बक्षीसे दिली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, स्पर्धा संयोजक विशाल उगले यांनी पत्रकार परिषदेत दिली. दुष्काळजन्य परीस्थितीमुळे "पाणी वाचवा'चा संदेश स्पर्धेतून दिला जाईल. 

स्पर्धेचे यंदा सहावे वर्ष असून देशभरातून स्पर्धक सहभागी होतात. स्पर्धेत बदल करण्यात आले असून यापूर्वी दिडशे किलोमीटर अंतराची स्पर्धा तीन सायकलपटूंचा समावेश असलेल्या संघांमध्ये घेण्यात येत होती. मात्र यंदाही स्पर्धा वैयक्तिक प्रकारात होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सायकलीस्टना इतर स्पर्धांत फायदा होण्यासाठी 15 व 50 किलोमीटरच्या स्पर्धांचे वयोगट बदलले आहेत. यावेळी नाशिक सायकलिस्ट्‌सचे सचिव नितीन भोसले, डॉ.हितेंद्र महाजन, डॉ.महेंद्र महाजन, शैलेश राजहंस, उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे, योगेश शिंदे, ऍड. वैभव शेटे, श्रीकांत जोशी, डॉ. मनीषा रौदळ, रामभाऊ लोणारी, शैलजा जैन, प्रफुल्ल पारेख, जिग्नेश नारंग आदी उपस्थित होते. 

असे आहेत गट व त्यांचे मार्ग 
दीडशे किलोमीटरची पेलेटॉन स्पर्धा 18 ते 30 वयोगट महिला व पुरुष गट, 30 ते 40 वयोगट महिला व पुरुष गट तसेच 40 वर्षावरील महिला व पुरुष गटासाठी असेल. सिटी सेंटर मॉलपासून वाडीवर्हे चौक, घोटी फाटा, टोल नाका, भावली धरण फाटा, कसारा घाट,तेथून यूटर्न मारत घाटन देवी, भावली धरण, आंबेवाडी गाव, वासाळी फाटा, पिंपळगाव मोर, घोटी मार्गे हॉटेल गेटवे येथे समारोप होईल. 50 किलोमीटरची मिनी पेलेटॉन स्पर्धा नाशिक-त्र्यंबकेश्वर-नाशिक या मार्गावर होईल. 12 ते 14 वयोगट, 15 ते 18 वयोगट मुले आणि मुलींसाठी 15 किलोमीटरची स्प्रिंट पेलेटॉन आणि हौशी सायकलिस्ट्‌ससाठी 5 किलोमीटरची "जॉय राईड'देखील आयोजित केली आहे. 

घाटाचा राजाचा किताब 
घाटातील अंतर कमीतकमी वेळेत पूर्ण करणाऱ्या स्पर्धकाला सन्मानित केले जाणार आहे. "जसपालसिंग विर्दी घाटाचा राजा स्मृती चषक' अशा किताबाने स्पर्धकाचा सन्मान केला जाईल. पारितोषिक वितरण समारंभ 6 जानेवारीला होईल. 

नावनोंदणीची सुविधा उपलब्ध- 
शिवशक्ती सायकल्स, गंगापूर रोड. 
लुथरा एजन्सीज, गंगापूर रोड. 
भांड सायकल्स, इंदिरा नगर. 
ए टू झेड सायकल्स, शालीमार. 
सायकल अड्डा, शालीमार. 
डिकॅथलॉन, विल्होळी. 

Web Title: marathi news nasik paletaon