कबड्डी संघातून वगळण्यात आल्याने कबड्डीपटू आम्रपालीची नाराजी

वृत्तसंस्था
शनिवार, 30 डिसेंबर 2017

संघटनेकडून संघात घेण्याबाबत आश्वासने दिली जात होती. जेव्हा कबड्डी संघ हैदराबादला जाण्यासाठी रवाना झाला तेव्हा ती मात्र घरीच होती. त्यामुळे आपल्याला वगळण्यात आल्याने तिची मोठी निराशा झाली. 

मुंबई : राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा हैदराबाद येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्यानंतर पुण्याची कबड्डीपटू आम्रपाली गलांडेला ऐनवेळी कबड्डी संघातून वगळण्यात आल्याने तिची नाराजी समोर आली. संघातून वगळण्यात आल्याने महाराष्ट्राकडून खेळण्याचे स्वप्न दुसऱ्यांदा भंग झाले.

महाराष्ट्राच्या महिला संघाची घोषणा 27 डिसेंबरला झाली. त्यामध्ये राज्याच्या निवड चाचणीच्या अंतिम फेरीत गेलेल्या पुण्याच्या संघातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आम्रपालीची निवड करण्यात आली होती. त्यानंतर पोटात दुखू लागल्याने तिने यावर उपचार घेतला. तिला डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यादरम्यान आम्रपालीच्या गर्भपिशवीला सूज आल्याने रुग्णालयात दाखल करावे लागणार असल्याचे राज्य कबड्डी संघटनेकडे अज्ञातांनी माहिती दिली. त्यानंतर संघटनेकडून तिला घरी जाण्याचा सल्ला देण्यात आला. 

आम्रपालीने संघटनेचे सचिव आस्वाद पाटील यांच्याशी याबाबत चर्चा केली. पण त्यांनीही तिचे काहीही न ऐकता वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले. मात्र, वैद्यकीय अहवाल आणल्यानंतरही तिला कोणत्याही प्रकारची दाद देण्यात आली नाही.  

संघटनेकडून संघात घेण्याबाबत आश्वासने दिली जात होती. जेव्हा कबड्डी संघ हैदराबादला जाण्यासाठी रवाना झाला तेव्हा ती मात्र घरीच होती. त्यामुळे आपल्याला वगळण्यात आल्याने तिची मोठी निराशा झाली. 

Web Title: marathi news national sports amrapali galande chosen in maharashtra kabaddi team and suddnely her name was not in the list pune news