पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांना आर्यनमॅनचा किताब

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

नाशिक : फ्रान्समधील विची येथे पार पडलेल्या "आयर्नमॅन 2018' या स्पर्धेचा किताब 52 वर्षीय नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पटकावला आहे. अत्यंत खडतर व अवघड असलेल्या आयर्नमॅन स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाकडून सहभागी झालेले ते एकमेव आपीएस अधिकारी होते.

दरम्यान, सायकलिंग, स्विमिंग अन्‌ रनिंग अशा तीनस्तरावर होणाऱ्या या स्पर्धेसाठीच्या निर्धारित वेळेपेक्षाही कमी वेळेत त्यांनी ही स्पर्धा रविवारी (ता.26) रात्री जिंकत नाशिकच्या नावलौकिकात भर घातली. 
 
जागतिक स्तरावर फ्रान्समध्ये होणारी "आयर्नमॅन' ही स्पर्धा मानाची समजली जाते. त्यामुळे या स्पर्धेसाठी जगभरातून क्रीडाप्रेमी सहभागी होत असतात. अत्यंत खडतर आणि अवघड असलेल्या या स्पर्धेमध्ये स्पर्धकाला निर्धारित 16 तासांच्या कालावधीमध्ये 180 कि.मी. अंतराची सायकलिंग, त्यानंतर 4 कि.मी. अंतराचे पोहणे (स्विमिंग) आणि त्यानंतर 42 कि.मी. अंतर धावावे (रनिंग) लागते. यामध्ये नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी 15 तास 13 मिनिटांमध्ये अंतर पार करीत, "आयर्नमॅन' हा किमाब पटकावला. ही स्पर्धा रविवारी (ता.26) सकाळी 5 वाजता सुरू झाली होती आणि रात्री आटोपली. स्पर्धा पार करून येताच त्यांना "आयर्नमॅन' घोषित केल्यानंतर श्री. सिंगल यांनी आनंदाने भारताचा तिरंगा ध्वज उंचावून आनंदोत्सव साजरा केला.  आयर्नमॅन 2018 या स्पर्धेसाठी जगभरातून तब्बल 1 हजार 300 स्पर्धक सहभागी झाले होते. यात महाराष्ट्र पोलीस दलातून डॉ. रवींद्रकुमार सिंगल हे एकमेव आयपीएस अधिकारी सहभागी झाले होते. 

Web Title: Marathi news police commissioner ravindra single