अनुकूल खेळपट्टीमुळे दोन्ही संघाचा विजयाचा दावा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

नाशिक- गोलदाजी आणि फलंदाजीस अनुकूल ठरेल,अशा पध्दतीने नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाची खेळपट्टी तयार झाली आहे. या अनुकूल खेळपट्टीमुळे चांगली धावसंख्या उभारण्याबरोबरच गडीही लवकर बाद होण्यास मदत होईल,असे महाराष्ट्र संघाचा अष्टपैलु खेळाडू केदार जाधव,प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांच्याबरोबरच सौराष्ट्र संघाचा आधारस्तंभ,अ÷ष्टपैलू जयदेव उनाडकट व प्रशिक्षक सिंताशू कोटक यांनी सांगत विजयाचा दावा केला. 

नाशिक- गोलदाजी आणि फलंदाजीस अनुकूल ठरेल,अशा पध्दतीने नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाची खेळपट्टी तयार झाली आहे. या अनुकूल खेळपट्टीमुळे चांगली धावसंख्या उभारण्याबरोबरच गडीही लवकर बाद होण्यास मदत होईल,असे महाराष्ट्र संघाचा अष्टपैलु खेळाडू केदार जाधव,प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांच्याबरोबरच सौराष्ट्र संघाचा आधारस्तंभ,अ÷ष्टपैलू जयदेव उनाडकट व प्रशिक्षक सिंताशू कोटक यांनी सांगत विजयाचा दावा केला. 

दोन्ही संघानी आज सराव केला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र संघातील प्रमुख अष्टपैलू फलंदाज केदार जाधव म्हणाला, या मैदानावर यापूर्वी झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने बाजी मारलेली आहे. त्यामुळे नाशिक आणि नाशिची खेळपट्टी आमच्यासाठी "लकी' आहे. बीसीसीआय क्‍युरेटनरानी गोलंदाजी,फलंदाजीस अनुकूल अशी खेळपट्टी तयार केली आहे. त्यामुळे सामना नक्कीच निकाली निघेल,आमचे फलंदाज निश्‍चित चांगली कामगिरी बजावतील. अर्धशतक,शतक झळकवणे हे आता नित्याचेच झाले आहे त्यापेक्षा आमचा संघ निर्विवाद विजय कसा संपादन करेल याला आम्ही प्राधान्य देणार आहोत. 
 

आता वेळ कामगिरी उंचावण्याची 
श्री.भावे म्हणाले,महाराष्ट्र संघाच्या फलंदाजांप्रमाणे गोलंदाजही चांगले काम करत आहे. महाराष्ट्र संघात चांगली गुणवत्ता आणि काहीतरी करून दाखविण्याची क्षमता आहे. त्यामुळे गोलंदाज,फलंदाजांनी असेच प्रयत्न सुरु ठेवत सर्वच बाबतीत आपली जबाबदारी पार पाडली तर महाराष्ट्राला यश अवघड नाही. हा सामना निर्विवाद जिंकणे यालाच आमचे प्राधान्य राहणार असून त्यासाठीच भारतीय टिममध्ये खेळलेला केदार जाधव,अंकित बावणे या अनुभवी खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. त्याचा अनुभव मोठा असल्याने इतर खेळाडूंना नक्कीच फायदा होईल. यापूर्वीच्या सामन्यांची स्थिती वेगळी होती. आज सौराष्टचे आव्हान असून त्यात आम्ही यशस्वी होऊ. नाशिककर सत्यजित बच्छावची कामगिरीतील सातत्य चांगले आहे त्यामुळे या सामन्यात त्याने पाच बळी घ्यावे असे मला वाटते. 

विजयाचे सातत्य राखणार 
सौराष्ट्र संघातील अष्टपैलु जयदेव उनाडकट व प्रशिक्षक सिंताशू कोटक म्हणाले,सौराष्ट्रने अ गटात सर्वीत्तम कामगिरी नोंदवत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. हेच सातत्य या सामन्यातही कायम ठेवू.गोलंदाजी,फलंदाजी व क्षेत्ररक्षण अशा सर्वच बाबतीत आम्ही संघटित खेळास प्राधान्य देत आलो आहोत आणि त्याचा आम्हाला फायदा होत आहे. चार दिवसाच्या खेळात आम्ही सर्वीत्तम खेळ करू,असेही एका प्रश्‍नांला उत्तर देतांना त्यांनी सांगितले. 

पुर्नप्रवेश अवघड,देशासाठी खेळण्याचा अभिमान 
भारतीय संघातून आत बाहेर होण्याबद्दल केदार म्हणाला, वाढती स्पर्धा आहे त्यामुळे संघातून आत बाहेर येणे सुरुच असते. भारतीय संघात पंधरा ते अठरा खेळाडू निश्‍चित आहे. मधल्याफळीत स्पर्धा मोठी आहे त्यामुळे माझ्यासह इतरांना स्थान मिळेलच हे सांगू शकत नाही, पण देशासाठी खेळलो ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट आहे. असेही त्याने नमूद केले. 

Web Title: marathi news ranji match