महाराष्ट्र-सौराष्ट्रला एकमेकांना अजमावण्याची संधी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नाशिक ः बीसीसीआयतर्फे येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शुक्रवार (ता. 14) पासून महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र ही लढत सुरू होत आहे. या सामन्याच्या निमित्ताने एकमेकांना अजमावण्याची संधी मिळाली आहे. बुधवारी (ता. 12) दोन्ही संघ दुपारपर्यंत दाखल होतील. त्यानंतर सायंकाळच्या सत्रात व गुरुवारी (ता. 13) सकाळच्या सत्रात हे संघ सराव करतील. मैदानासह प्रेक्षक गॅलरी, खेळाडूंची व्यवस्था ही सर्व कामे अंतिम टप्प्यात असून, मंगळवार (ता. 11) सायंकाळपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. 

रणजी स्पर्धेतील महाराष्ट्रात होणाऱ्या पाच सामन्यांपैकी महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र ही लढत नाशिकला होत आहे. हा सामना निश्‍चित झाल्यापासून नाशिककरांमध्ये उत्सुकता आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात महाराष्ट्र विरुद्ध मुंबई ही लढत अनिर्णित अवस्थेत राहिली. फलंदाजाच्या चुकांमुळे प्रत्येक दिवशी सामन्याचे पारडे बदलताना दिसले. या सामन्यात महाराष्ट्र आणि मुंबई या दोन्ही संघांना निर्णायक विजयाची संधी निर्माण झाली होती. त्यानंतरही कुणालाच यश नोंदवता आले नाही.

या लढतीत पहिल्या डावात मिळविलेल्या आघाडीच्या तीन गुणांवर महाराष्ट्राला समाधान मानावे लागले. आता सौराष्ट्रला नमवून अधिक गुण संपादन करण्याचे महाराष्ट्राचे नियोजन असेल. आतापर्यंतच्या सामन्यात महाराष्ट्राने सात गुण कमवले आहेत; पण तरीही या संघाच्या क्रमवारीत सुधारणा झालेली नाही. दुसरीकडे सौराष्ट्र एक विजयासह तेरा गुण मिळवून तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळेच सौराष्ट्र काय कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. 

चोख नियोजनावर अधिक भर 
दोन्ही संघांकडून चांगला खेळ नाशिककरांना पाहाता यावा, त्याचप्रमाणे ही खेळपट्टी फलंदाजी, गोलंदाजीला साथ देणारी ठरावी, यासाठी बीसीसीआयने यापूर्वीच सामन्याचे पंच, ऑनलाइन स्कोरर, मॅन्युअल स्कोरर, व्हिडिओ ऍनालिस्टबरोबरच ग्राउंड क्‍युरेटर रमेश म्हामूनकर यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर मैदान व खेळपट्टीचे काम जोरात सुरू आहे. हिरवळीचे प्रमाण योग्य राखण्याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. जवळपाच पाच ते सहा प्रेक्षक बसतील एवढ्या क्षमतेची गॅलरी उभारण्यात आली आहे. दैनंदिन कामात कुठेही विस्कळितपणा येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. शिवाय दररोजच्या कामांचा आढावा सायंकाळी घेण्यात येऊन दुसऱ्या दिवसाचे नियोजन केले जाते. 

केदार जाधव, जयदीप उनाडकट आणि सत्यजित बच्छाव 
या सामन्यात महाराष्ट्राकडून खेळणारा केदार जाधव व सौराष्ट्रचा जयदीप उनाडकट यांचा समावेश असणार आहे. त्याचजोडीला नाशिकचा डावखुरा फिरकी गोलंदाज सत्यजित बच्छाव यालाही घरच्या मैदानावर नाशिककरांना आपला खेळ दाखविण्याची संधी मिळाली आहे. याशिवाय आयपीएलमध्ये प्रतिनिधीत्व केलेले खेळाडूही सहभागी होतील. 
 
Web Title: marathi news ranji match mahrashtra vs sourashtra