सरावासाठी आणखी निवड चाचणी,निमंत्रिताच्या स्पर्धा हव्यात: शैलजा जैन 

residentional photo
residentional photo

सिन्नर-  आठ ते दहा वर्षापूर्वी महाराष्ट्रात निवड चाचणी,निमंत्रिताच्या कबड्डी स्पर्धा नियमित घेण्यात येत,पण आज या स्पर्धांचे प्रमाण निम्यावर आले आहे. महापौर कबड्डी सारख्या इतर निमंत्रिताच्या स्पर्धां तर बंद झाल्यात जमा आहे. बोटावर मोजण्याइतक्‍यात कबड्डीच्या स्पर्धा होतात,निवड चाचणीच्या बाबतीतही फारसे आशादायक चित्र नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे कबड्डीपटू इतरांच्या तुलनेत मागे पडतात. त्यांना स्पर्धेसाठी आवश्‍यक असणारा सराव करायलाच मिळत नाही,अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शैलजा जैन यांनी "सकाळ'शी बोलतांना नमूद केले. स्पोर्टस्‌ ऍथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात साईने काही निवडक मुली-मुलींची निवड करून त्यांना विशेष प्रशिक्षक देण्याचे ठरविले असून त्यात महाराष्ट्राचे कबड्डपटू कमीच आहे. 

जकार्ता(इंडोनेशिया) येथील अशियाई क्रीडा स्पर्धेत इराणच्या महिला कबड्डी संघाने भारतावर मात करीत जेतेपद पटकावले. ही किमया करणाऱ्या मूळच्या नाशिकच्या व इराणच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणाऱ्या शैलजा जैन यांनी सर्वांचेच लक्ष वेधले आहे. येथे सुरु असलेल्या वरिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी सौ.जैन सध्या नाशिकला आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी "सकाळ"शी विविध मुद्यांवर संवाद साधला. त्या म्हणाल्या,सिन्नरच्या स्पर्धेचे सर्वच बाबतीत उत्तम संयोजन ठरत आहे. किंबहुना स्पर्धा नियोजन कसे असावे, ही सहयाद्री मंडळाने भरविलेल्या या स्पर्धेतून पहायला मिळते. स्पर्धेमुळे सिन्नर तालुक्‍यासह आजूबाजूच्या खेड्यात मराठमोळ्या कबड्डीविषी वातावरणनिर्मितीस मदत झाली आहे. कबड्डी,कुस्तीचे सामने अशा पध्दतीने शहराबाहेर भरविण्याची आज खरी निर्माण झाली आहे. या स्पर्धेतून स्थानिकांना नावाजलेल्या कबड्डीपटूंचा खेळ पाहण्याची संधी मिळते, शिवाय आपणही खेळात सहभागी व्हावे,असे उदयोन्मुख खेळाडूंना वाटते. 

केंद्र व राज्य सरकारतर्फे खेलो इंडियासारखे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. ही चांगली बाब आहे. पण हे काही काळापुरतेच मर्यादित असतात. वर्षभर वातावरणनिर्मिती होत नाही असे सांगून त्या म्हणाल्या,आठ दहा वर्षापुर्वी, नाशिकसह मुंबई, ठाणे,कल्याण अशा मोजक्‍यात महापालिकांच्या महापौर स्पर्धा नियमित भरविल्या जात. आज मात्र त्यात सातत्य नाही, महापौर स्पर्धा तर जवळपास बंद झालेल्या आहेत. निमंत्रिताच्या स्पर्धाही बोटावर मोजण्याइतक्‍याच आहे. त्यामुळे कबड्डीपटूंना सराव करायला मिळत नाही. एखादी स्पर्धेची घोषणा झाली की तेवढ्यापुरते स्पर्धेचा सराव केला जातो. मात्र त्यानंतर कबड्डीपटू अभ्यास व इतर कामात व्यस्त होतात. हे चूकीचे वाटते. खेळाडूंना वर्षभर सराव करायला मिळाला पाहिजे आणि तो सराव फक्त नियमित कबड्डी स्पर्धांमधूनच मिळू शकतो. 

"साई'चा कौतुकास्पद पुढाकार 
साईने काही खेळ निश्‍चित करून त्या खेळातील निवडक खेळाडूंना वर्षभर प्रशिक्षण देण्यास सुरवात केली आहे. त्यात कबड्डीचाही समावेश आहे. असे सांगून सौ. जैन म्हणाल्या,साई कबड्डीच्या प्रशिक्षणासाठी निवडलेल्या मुलांमध्ये सर्वाधिक हरियाणाच्या सात मुली आहे तर महाराष्ट्राच्या दोघींनाच स्थान मिळाले आहे. पंजाब,हरियाणा, दिल्लीसारख्या शहरांमध्ये वर्षभर स्पर्धा होतात,त्यामुळे तेथील कबड्डीपटू चांगली कामगिरी बजावून लक्ष वेधतात. साईच्या निवड प्रक्रीयेतही याच राज्याचे कबड्डीपटू वरचढ ठरले. पुरुषांच्या संघात तर कुणालाच संधी मिळू नये, याबद्दल खेद वाटतो. 
 

साईने काही खेळ निश्‍चित करून त्या खेळातील निवडक खेळाडूंना वर्षभर प्रशिक्षण देण्यास सुरवात केली आहे. त्यात कबड्डीचाही समावेश आहे. असे सांगून सौ. जैन म्हणाल्या,साई कबड्डीच्या प्रशिक्षणासाठी निवडलेल्या मुलांमध्ये सर्वाधिक हरियाणाच्या सात मुली आहे तर महाराष्ट्राच्या दोघींनाच स्थान मिळाले आहे. पंजाब,हरियाणा, दिल्लीसारख्या शहरांमध्ये वर्षभर स्पर्धा होतात,त्यामुळे तेथील कबड्डीपटू चांगली कामगिरी बजावून लक्ष वेधतात. साईच्या निवड प्रक्रीयेतही याच राज्याचे कबड्डीपटू वरचढ ठरले. पुरुषांच्या संघात तर कुणालाच संधी मिळू नये, याबद्दल खेद वाटतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com