छत्रपती पुरस्कार विजेते दौलतराव शिंदे निधन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

नाशिक नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे संस्थापक,जेष्ठ क्रीडासंघटक,शिवछत्रपती पुरस्कार विजेते दौलतराव शिंदे(वय84) यांचे आज पहाटे वृध्दापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी,मुले,सुना,जावई असा परिवार आहे. दौलतराव शिंदे यांच्या जाण्याने कबड्डी खेळाचा चालता बोलता इतिहासच हरपला आहे. 

1960 च्या दशकापासून कबड्डीशी जोडले गेल्यानंतर साधारण कार्यकर्त्यांपासून जिल्हा राज्य आणि अखिल भारतीय संघटनेवर विविध पदे दौलतराव शिंदे यांनी भूषवली. 1964 ला नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनची स्थापना झाली. त्याचवेळी मनमाडला नवजीवन क्रीडा मंडळाने शहरात प्रथमच राज्यस्तरीय वरिष्ठ गटाच्या अजिंक्‍यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले होते. कबड्डीच्या खेळाच्या आवाका पाहून कै.शंकर(बुवा) साळवी यांनी दौलतराव शिंदे यांच्यावर व नवजीवन क्रीडा मंडळावर विविध स्पर्धांची जबाबदारी सोपवली.

नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या प्रमुख कार्यवाहपदी काम करत असतांना नाशिक जिल्ह्याच्या कबड्डी खेळाचा प्रचार व प्रसारासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांनी काम केले. 1981 ला गुलालवाडीची माधवी गायधनी व दौलतराव यांनी भारतीय कबड्डी संघाबरोबर जपान,मलेशिया,थायलंड,फिलिपिन्स,हॉंगकॉग या देशाचा दौरा केला. राज्य शासनाने 1996-97 ला त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जेष्ठ कार्यकर्तासाठी दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविले. राज्य संघटनेचे सहकार्यवाह,तांत्रिक समितीचे अध्यक्ष,पंच मंडळाचे अध्यक्ष,अखिल भारतीय कबड्डी संघटनेच्या नियम समितीचे निमंत्रक अशा अनेक पदावर त्यांनी काम केले. रेल्वेत काही काळ अभियंता पदावर त्यांनी काम केले होते. 

Web Title: marathi news shinde passaway