शिव छत्रपती पुरस्कार जाहीर; तीन वर्षांसाठीच्या 195 जणांचा होणार सन्मान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

मुंबई : तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिव शिव छत्रपती पुरस्कांची घोषणा करण्यात आली. 2015-15 ते 2016-17 असे तीन वर्षांचे एकत्रित पुरस्कार देण्यात येणार असून एकूण 195 खेळाडू, मार्गदर्शक, संघटक आदींना गौरवण्यात येणार आहे.

येत्या शनिवारी गेटवे इंडिया येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. रमेश तावडे (14-15), अरुण दातार (15-16) आणि बिभीषण पाटील (16-17) यांना जीवगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले.

शिव छत्रपती पुरस्कारांच्या निवडीत होणारे वाद टाळण्यासाठी आणि पादर्शकता आणून योग्य त्या खेळाडूं-संघटक-मार्गदर्श यांची निवड केली त्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर केला आणि त्यावर हरकती मांडण्यासाठी सांगितले अशा सर्व बाबींतून पुरस्कारार्थी निवडले, असे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी पुरस्कांची घोषणा करताना सांगितले. 

तीन वर्षांसाठी एकूण 776 जणांनी अर्ज केले होते त्यातून 195 खेळाडूंना पुरस्कार देण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धत असल्यामुळे 141 जणांनी हरकती घेतल्या होत्या. अशीही माहिती तावडे यांनी दिली. 195 खेळाडूंमध्ये थेट पुरस्कारांची संख्या अधिक आहे. पॅरालिम्पिक, जागतिक, आशियाई, राष्ट्रकुल पॅरागेम्स आदी विश्‍व स्तरावरील स्पर्धांमध्ये देशाचे नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंना थेट पुरस्कार देण्यात येतो असे तावडे यांनी सांगितले.

पुरस्कार रचना (तीन वर्ष)
जीवन गौरव पुरस्कार (3), शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार (127), मार्गदर्शक (31), जिजामाता पुरस्कार मार्गदर्शक (1), जिजामाता संघटक-कार्यकर्ते पुरस्कार (2), शिव छत्रपती संघटक-कार्यकर्ते पुरस्कार (19), साहसी पुरस्कार (5), एकलव्य पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) (7)

पुरस्कार रक्कम : जीवन गौरव :-3 लाख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह. खेळाडू, मार्गदर्शक, साहसी, कार्यकर्ता, संघटक आदींना :- एक लाख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह.

निवड समिती : क्रीडा मंत्री, प्रधान सचिव, आयुक्त शालेय शिक्षण, क्रीडा व युवक, रघुनंदन गोखले (द्रोणाचार्य), अंजली भागवत (खेलरत्न), शितल महाजन (पद्मश्री), शिला कानुगो (महाराष्ट्र ऑलिंपिक).

पुरस्कार सोहळा : गेटवे ऑफ इंडिया, 17 फेब्रुवारी सायंकाळी 5 पासून

Web Title: marathi news Shiv Chhatrapati Krida Puraskar Sports Awards Maharashtra