वानखेडेनंतर रॉस 'दर्जी'ची ट्विटरवर फटकेबाजी

सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दणदणीत बॅटिंग केल्यानंतर न्यूझीलंडच्या रॉस टेलर याने ट्विटरवरही फटकेबाजी केली आणि तीही वीरेंद्र सेहवागच्या ट्विटवर. 

सेहवागचे ट्विटर हँडल मुळातच धमाल. सेहवागचे क्रिकेट जसे मोकळेढाकळे, तसेच त्याचे ट्विटही. रविवारच्या सामन्यात रॉस टेलरने 95 धावांची विजयी खेळी केली होती. त्याच्या आडनावाचा हिंदी अर्थ आणि दिवाळीचा संदर्भ देत, सेहवागने ट्विट केले, 'Darji ji . Great effort after handling the pressure of Diwali orders.'

टेलरचा हिंदी अर्थ दर्जी किंवा शिंपी. सेहवागच्या ट्विटवर गप्प बसेल, तो रॉस टेलर कसा. त्याने सेहवागला उत्तरादाखल ट्विट केले, की पुढच्या दिवाळीची ऑर्डर आधीच देऊन ठेव; म्हणजे डिलीव्हरी दिवाळीआधी करता येईल. विशेष म्हणजे रॉस टेलरने हे ट्विट रोमन हिंदीत केले. त्याच्या उत्तराने खुद्द सेहवागही आश्चर्यचकित झाला असावा. 

'तुझ्यासारखे स्टिचिंग कुणाला जमणार नाही, पँट असो वा पार्टनरशीप', असे आणखी ट्वीट सेहवागने केले. 

त्यालाही रॉस टेलरने उत्तर दिले !

ट्विटर आज दिवसभर सेहवाग आणि रॉस टेलरचे ट्विट ट्रेंडिंग टॉपिक्समध्ये आले आहे.

Web Title: Marathi news sports news in Marathi Ross Taylor Virender Sehwag Twitter