चित्राची निवड करण्याची गोयल यांची सूचना 

वृत्तसंस्था
रविवार, 30 जुलै 2017

मुंबई/ नवी दिल्ली : मध्यम पल्ल्याची धावपटू पी. यू. चित्रा हिची जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्याची सूचना केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघास केली आहे. लंडनला होणाऱ्या स्पर्धेत चित्राचा सहभाग असेल, याची खबरदारी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने घ्यावी, असा आदेश केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. 

मुंबई/ नवी दिल्ली : मध्यम पल्ल्याची धावपटू पी. यू. चित्रा हिची जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्याची सूचना केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघास केली आहे. लंडनला होणाऱ्या स्पर्धेत चित्राचा सहभाग असेल, याची खबरदारी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने घ्यावी, असा आदेश केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. 

गोयल यांनी भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांच्याबरोबर चर्चा केली. चित्राबाबतच्या केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयास आव्हान न देण्याची सूचना गोयल यांनी केली. या वेळी तिला जागतिक स्पर्धेसाठी वाइल्ड कार्ड मिळाले आहे, याकडेही लक्ष वेधल्याचे क्रीडा मंत्रालयाच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

चित्राने भुवनेश्वरला झालेल्या आशियाई स्पर्धेत 1500 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते; पण त्यानंतर तिची कामगिरी खालावली आहे, असे सांगत भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने जागतिक स्पर्धेसाठी तिला वगळले. याविरोधात चित्राने केरळ न्यायालयात याचिका सादर केली. आशियाई स्पर्धेतील यशामुळे आपली जागतिक स्पर्धेसाठी थेट निवड झाली असल्याचे तिने सांगितले. 

जागतिक स्पर्धेसाठीची संघनिवड प्रक्रिया पूर्ण पारदर्शक नाही. पात्र स्पर्धकांना डावलण्यात आले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. चित्राने जागतिक स्पर्धेचा पात्रता निकष नोंदवला नसल्याचे पी. टी. उषाने नुकतेच सांगितले होते. 

चित्राची खालावती कामगिरी 

  • 1500 मीटर शर्यतीसाठी पात्रता वेळ : 4 मि. 7.50 सेकंद 
  • चित्रा फेडरेशन स्पर्धेत (जून) : 4 मि. 26.48 से. (विजेती) 
  • आशियाई स्पर्धेत (जुलै) : 4 मि. 17.92 सेकंद (विजेती) 
  • राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धा : 4 मि. 28.87 सेकंद (दुसरी) 
  • राष्ट्रीय युवा स्पर्धेतील विक्रम : 4 मि. 17.29 सेकंद 

(निवड समितीने संघातून वगळताना केलेली टिप्पणी : आशियाई स्पर्धेनंतर कामगिरी खालावली. राष्ट्रीय कुमार विक्रमापेक्षा खालची वेळ, जागतिक स्पर्धेच्या पात्रता वेळेच्या नजीक नाही. सर्व माहिती भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाच्या पत्रकानुसार.)

Web Title: marathi news sports news P U Chitra Vijay Goel World Athletics