आघाडी नव्हे निर्विवाद विजयासाठीच महाराष्ट्राचे प्रयत्न: सुरेंद्र भावे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

नाशिक  बलाढ्य मुंबईवर पहिल्या डावाच्या आघाडीने महाराष्ट्र संघाने विजय नोंदविल्याने आमचा आत्मविश्‍वास वाढला आहे. गटात अव्वल असलेल्या सौराष्ट्रासह पुढील सामन्यामध्ये केवळ डावाने,आघाडी नव्हे तर निर्विवाद(आऊटरेट) विजय मिळविणे. यासाठीच आमचा प्रयत्न राहिल,असे महाराष्ट्राच्या रणजी संघाचे प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांनी सांगितले. नाशिककर सत्यजित बच्छावने घरच्या मैदानावर किमान पाच गडी बाद करत अव्वल कामगिरी नोंदवावी,असेही ते म्हणाले. 

नाशिक  बलाढ्य मुंबईवर पहिल्या डावाच्या आघाडीने महाराष्ट्र संघाने विजय नोंदविल्याने आमचा आत्मविश्‍वास वाढला आहे. गटात अव्वल असलेल्या सौराष्ट्रासह पुढील सामन्यामध्ये केवळ डावाने,आघाडी नव्हे तर निर्विवाद(आऊटरेट) विजय मिळविणे. यासाठीच आमचा प्रयत्न राहिल,असे महाराष्ट्राच्या रणजी संघाचे प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांनी सांगितले. नाशिककर सत्यजित बच्छावने घरच्या मैदानावर किमान पाच गडी बाद करत अव्वल कामगिरी नोंदवावी,असेही ते म्हणाले. 

शुक्रवार(ता.14) पासून येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर महाराष्ट्र विरूध्द सौराष्ट ही लढत सुरु होत आहे. आज दुपारी महाराष्ट्र संघाचे नाशिकमध्ये आगमन झाले. त्यानंतर महाराष्ट्र संघाने सायंकाळच्या सत्रात सराव केला. या सरावानंतर श्री.भावे यांनी विविध मुद्यांवर संवाद साधला.ते म्हणाले, गेल्या काही वर्षात बीसीसीआयने आपल्या नियमात मोठे बदल केले असून खेळपट्टीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. सामन्यापूर्वी बीसीसीआयने क्‍युरेटला पाठवून गोलंदाजी,फलंदाजीस अनकूल ठरेल अशी खेळपट्टी तयार करण्यास प्राधान्य दिले आहे. नाशिकची खेळपट्टीसुध्दा खूपच अप्रतिम तयार केली आहे. त्याचा फलंदाजांबरोबरच गोलंदाजही निश्‍चित फायदा उठवतील. सध्याचा महाराष्ट्र संघ सर्वचबाबतीत तुल्यबळ आहे त्यामुळे या सामन्याचा निकाल नक्कीच लागेल यात शंका नाही. 
उपहारापूर्वीचा खेळ महत्वाचा,सत्यजितकडे लक्ष 

ते म्हणाले,महाराष्ट्राच्यादृष्टीने हा सामना अंत्यत महत्वाचा आहे. पुण्यातील हवामान,वातावरण हे नाशिकशी मिळतेजुळते आहे. त्यामुळे येथेही आम्हाला वाढती थंडी,धुके,दवचा सामना करावा लागेल,पण सामन्याच्या चारही दिवसात उपहारापूर्वीचा खेळ हा सर्वात महत्वाचा असेल, या खेळपट्टीवर प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाला गडी बाद करण्याची अधिक संधी मोठी धावसंख्या उभारण्याबरोबरच गडी बाद करण्यावर भर दिला जाईल. नाशिककर सत्यजित बच्छावने आतापर्यत दोन,तीन गडी बाद करत कामगिरी नोंदवली आहे. विजय हजारे करंडक,एकदिवसीय सामन्यांमध्ये ज्यापध्दतीने चार-पाच गडी बाद करण्याची गोलंदाज कामगिरी बजावतात,तशा कामगिरीची सत्यजितकडून अपेक्षा असून घरच्या मैदानावर सत्यजित नक्कीच चमकेल व महाराष्ट्राच्या विजयात हातभार लावेल,असे ते म्हणाले, आमच्या गटात पश्‍चिम विभागाचेच पाच बलाढ्य संघ आहेत. संघाच्या कामगिरीवरच पुढे "ड' गटातून रेल्वे किंवा दुसऱ्या संघातील गुणांच्या सरासरीवर आम्हाला पुढे जात येईल,असे ते म्हणाले, 

आणि अंकीत,केदारचा समावेश... 
"अ' गटात नऊ सामन्यापैकी महाराष्ट्र संघाचे 4 सामन्यात 7 गुण झाले असून ते पाचवा तर गटात सौराष्ट्र अव्वलस्थानी आहे. त्यांचे पाच सामन्यात 19 गुण झाले असून ते सहावा सामना खेळत आहे. दोन सामन्यात त्यांनी निर्विवाद विजय नोंदवला शिवाय इतर सामनेही आघाडी,डावाने जिंकले. महाराष्ट्राला पात्रता फेरीत पोहचण्यासाठी पुढील सर्व सामन्यात प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. त्यासाठी यापूर्वी फक्त एक-एक सामना खेळलेल्या केदार जाधव व कर्णधार अंकित बावणे यांचा तातडीने संघात समावेश करण्याचा निर्णय झाला. यापूर्वीच्या चारही सामन्यात महाराष्ट्राच्या कर्णधारपदाची धुरा राहुल त्रिपाठी याने सांभाळली होती. केदार व अंकितच्या समावेशामुळे महाराष्ट्र संघ काय कामगिरी करतो याकडे आता साऱ्याचेच लक्ष असेल. अंकित न्युझीलंडमध्ये स्पर्धेसाठी गेलेला असल्याने तो आज सरावात सहभागी होऊ शकला नाही. उद्या(ता.12) दुपारपर्यत तो नाशिकमध्ये येईल व परवा तो संघात असेल,असे श्री.भावे यांनी सांगितले. सौराष्ट्र संघाचे रात्री उशिरा आगमन होणार असून उद्याच्या सराव सत्रात ते भाग घेतील. 

सौराष्ट संघ असाः अर्पित वासवडा,जयदेव उनाडकट,शेल्डॉन जॅक्‍सन,स्नील पटेल,हर्दिक देसाई,प्रेरक मंकड,चिराग जानी,अवि बेरॉट,किसन परमार,धमेंद्र जडेजा,हार्दिक राठोड,वंदित जीवराजानी,कमलेश मकवाना,जय चौहाण,चेतन सकारीया,विश्‍वराज जडेजा, व्यवस्थापक-डॉ.अर्जुनसिंह राणा,प्रशिक्षक-सितांशु कोटक,सहाय्यक प्रशिक्षक-निरज ओड्रेड्रा 
 

Web Title: marathi news surendra bhave