राज्य  मानांकन टेनिस स्पर्धेत पाटील,पांडे,कांबळे यांची विजयी सलामी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

नाशिकः नाशिक जिमखान्यात आजपासून सुरु झालेल्या तिसऱ्या राज्य मानांकन टेनिस स्पर्धेत सिध्देश पांडे, तेजस कांबळे यांनी मुलांच्या गटात तर मुलींच्या गटात पूजा जोरवाड,मनुश्री पाटील यांनी मुलींच्या गटात वर्चस्व राखत विजयी सलामी दिली.

नाशिकः नाशिक जिमखान्यात आजपासून सुरु झालेल्या तिसऱ्या राज्य मानांकन टेनिस स्पर्धेत सिध्देश पांडे, तेजस कांबळे यांनी मुलांच्या गटात तर मुलींच्या गटात पूजा जोरवाड,मनुश्री पाटील यांनी मुलींच्या गटात वर्चस्व राखत विजयी सलामी दिली.
 अर्जुन पुरस्कार विजेते टेनिसपटू कमलेश मेहता यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे राज्य प्रवक्ते प्रा.सुहास फरांदे, राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे सरचिटणीस यतीन टिपणीस ,स्पर्धेचे संयोजन समिती अध्यक्ष तथा छत्रपती पुरस्कार प्राप्त नरेंद्र छाजेड , राज्य संघटनेचे प्रकाश जसानी , सरचिटणीस शेखर भंडारी , राजेश भरवीरकर, संजय मोडक, प्रमुख पंच रोहित शिंदे आदी  उपस्थित होते . 

श्री.छाजेड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.  श्री..यतीन टिपणीस , प्रा.सुहास फरांदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे कमलेश मेहता म्हणाले, टेबल टेनिस खेळ जगाच्या नकाश्‍यावर आता प्रथम क्रमांकावर आलेला आहे , खेळाडूंनी कठोर मेहनत करून आपले आणि आपल्या राज्याचे आणि देशाचे नाव उज्वल करावे असे सांगितले. यावेळी त्यांनी स्पर्धेच्या हॉल मध्ये आत्ताच्या यावर्षीच्या कॉमनवेल्थ गेम मधील सुवर्ण पदक विजेत्या नामांकित भारतीय टेबल टेनिस खेळाडूंचे फोटो लावले. अन्यथा इतर ठिकाणी परदेशी खेळाडूंचे लावल्याचे नेहमी निदर्शनास येते. या उपक्रमाबद्दल त्यांनी संयोजकांचे विशेष कौतुक केले..

यावेळी  शिवछत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे, नितीन चौधरी, एच.डी.फ.सी बॅंकेचे चैतन्य डबीर, एकवीराचे वैभव जोशी, संजय मोडक, करण रौंदळ, संजय कोटेचा, पियुष चोपडा आदी उपस्थित होते.. ह्या स्पर्धा वेग वेगळ्या वयोगटात खेळविल्या जात आहे. आजचा निकाल असा 
युथ बॉइज 
सिद्धेश पांडे (ठाणे) वि.वि. जश दळवी(ठाणे) 11-4,11-7,11-4 
तेजस कांबळे (ठाणे) वि.वि. प्रथमेश पारकर (ठाणे) 11-7,11-8,.11-8 
दीपेश पाटील (ठाणे) वि. वि. तन्मय राणे (मुंबई शहर ) - 8-11,11-4,11-4,9-11,11-4
अश्विन सुब्रमण्यन (मुंबई उपनगर ) वि. वि. आर्य सेठी (पुणे)11-8.11-6.11-6
युगांध झेंडे (ठाणे) वि. वि. विराज कोटेचा (नाशिक ) 10-12,11-6,8-11,11-6,11-5
मंदार हळदीकर (मुंबई उपनगर) वि. वि. करण कुकरेजा (पुणे) 11-8,11-8,11-5 
युथ गर्ल्स 
) पूजा जोरवार (पुणे )वि.वि. अनुजा झंवर (नाशिक ) 13-11,11-7,9-11,11-8 
) मनुश्री पाटील (मुंबई उपनगर )वि.वि. साक्षी अफजलपूरकर (नाशिक ) 13-11,11-7,11-3

Web Title: marathi news table tennis competition