टायगर वुडस् याच्या मृत्यूची अफवा

टीम ई सकाळ
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

दिग्गज गोल्फपटू टायगर वुडस् याच्या मृत्यूच्या अफवेने जगभरातील क्रीडा क्षेत्रात शुक्रवार रात्रीपासून खळबळ उडाली. अमेरिकास्थित एका वेबसाईटने टायगर वुडस् याच्या मृत्यूची बातमी ऑनलाईन प्रकाशित केल्यामुळे हा गोंधळ उडाला. 

दिग्गज गोल्फपटू टायगर वुडस् याच्या मृत्यूच्या अफवेने जगभरातील क्रीडा क्षेत्रात शुक्रवार रात्रीपासून खळबळ उडाली. अमेरिकास्थित एका वेबसाईटने टायगर वुडस् याच्या मृत्यूची बातमी ऑनलाईन प्रकाशित केल्यामुळे हा गोंधळ उडाला. 

वुडस् याचा फ्लोरिडा राज्यातील ज्युपिटर आयलंड अपार्टमेंटमध्ये पहाटे पाच वाजून दहा मिनिटांनी मृत्यू झाला असल्याची बातमी ह्युस्टन न्यूज या वेबसाईटने दिली. अल्कोहोलमधून विष दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल असल्याचा दावा बातमीत केला गेला. त्यामुळे, क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली. टायगर वुडस् हा जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रीडापटूंपैकी एक आहे. त्याच्या मृत्यूच्या बातमीची खात्री पटविण्यासाठी अनेकांनी सोशल मीडियावर धाव घेतली. मात्र, तेथेही वुडस् याच्या मृत्यूची आणि मृत्यू झाला नसल्याची उलटसुलट माहिती प्रकाशित झाली आहे. 

वुडस् याच्याबद्दल माध्यमांमध्ये यापूर्वीही अफवा पसरवल्या गेल्या आहेत. वुडस् एकदा दारुच्या नशेत पकडला गेल्याच्या सत्य घटनेनंतर तशाच स्वरुपाच्या अनेक अफवा पसरवल्या गेल्या होत्या. अफवा रोखणाऱया काही वेबसाईटनी शुक्रवारच्या घटनेवर तातडीने खुलासे प्रकाशित केले आहेत. वुडस् ठणठणीत असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. ट्विटर आणि फेसबूकवर मात्र अनेक चाहते वुडस् याच्या मृत्यूच्या खोट्या बातमीला बळी पडले. त्यांनी वुडस् याला जिवंतपणीच श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.

Web Title: Marathi news Tiger Woods news hoax