अंजुमचे सुवर्णपदक दोन दशांश गुणांनी हुकले

वृत्तसंस्था
शनिवार, 10 मार्च 2018

मुंबई : वादळी वाऱ्यांना दाद न देता अंजुम मौदगिल हिने प्रयत्नांची शर्थ केली; पण तिचे मेक्‍सिको विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनमधील सुवर्णपदक दोन दशांश गुणांनी हुकले. भारताचे या स्पर्धेतील पहिलेच रौप्यपदक; तसेच एकंदरीत आठवे पदक होय. भारताने पदक क्रमवारीतील अग्रस्थान अद्यापही कायम राखले आहे. 

गुआदाजारा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या सहाव्या दिवशी झालेल्या अंतिम फेरीत अंजुम सुरवातीपासून पदकाच्या शर्यतीत होती. पंधरा शॉट्‌सच्या नीलिंग प्रकारानंतर ती तिसरी होती. प्रोनच्या दहा शॉटस्‌नंतर तिने दुसरा क्रमांक मिळविला होता.

नीलिंग प्रकारातील काही शॉट्‌सनंतर अंजुमने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेली जॉनी बेअर हिला 0.9 गुणांनी मागे टाकले होते. प्रोनचे पंधरा शॉट्‌स संपले त्या वेळीही अंजुम आघाडीवर होती. स्टॅंडिंग प्रकारातील दहाव्या शॉट्‌सनंतर कटऑफ आले तोपर्यंत अंजुमची पीछेहाट झाली होती आणि ती चौथ्या क्रमांकावर गेली होती. 

त्यानंतरही अंजुमने हार मानली नाही. 41 व्या शॉट्‌समधील 10.8 कामगिरीमुळे अंजुम दुसऱ्या क्रमांकावर गेली. तिने त्यानंतरच्या शॉट्‌समध्ये 10.2, 10.1, 9.5 आणि 10.2 अशी कामगिरी करीत रौप्यपदक राखले. अखेर क्रमवारी निश्‍चित झाली, त्या वेळी अंजुमचे 454.2; तर चीनच्या रुईजिओ पेई हिचे 455.4 गुण होते. चीनच्या तिंग सुन हिने ब्रॉंझ जिंकले. 

पात्रतेत प्रोनमध्ये 400 पैकी 399 गुण मिळवल्याने अंजुम 1170 गुणांसह दुसरी आली. रुईजिओ हिने 1178 गुणांचा जागतिक विक्रम केला होता. भारताने पदक क्रमवारीत तीन सुवर्णपदकांसह आठ पदके जिंकत आघाडी राखली आहे; पण दोन सुवर्णपदकांसह पाच पदके जिंकलेला चीन भारतासमोर आता आव्हान निर्माण करीत आहे. 

अंजुमची सहकारी गायत्री स्टॅंडिंगमध्ये 371 गुणच मिळवू शकल्याने अंतिम फेरीपासून दूर राहिली. ती 1153 गुणांसह पंधरावी आली. माजी जागतिक विजेत्या तेजस्विनी सावंत सोळावी आली. तिचेही 1153 गुणच झाले. पंधरा वर्षीय अनिष भानवाल हा 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये पहिल्या टप्प्यानंतर 294 गुणांसह तिसरा होता; पण दुसऱ्या टप्प्याच्या अंतिम टप्प्यातील अखेरच्या पाच शॉटस्‌मध्ये तो 42 गुणच मिळवू शकला. अखेर त्याचे 578 गुण झाले. अचूक गुणांच्या स्पर्धेत चीनच्या झाओनान हाओ याने अनिषला मागे टाकले आणि अव्वल सहामध्ये येत अंतिम फेरी गाठली. नीरज कुमार 569 गुणांसह तेरावा आला.

Web Title: marathi news World Cup Shooting anjum moudgil