केजच्या कविताची क्रिकेटमध्ये भरारी

केजच्या कविताची क्रिकेटमध्ये भरारी

केज - येथील कविता पाटील हिची भारतीय महिला क्रिकेटच्या ‘अ’ संघात निवड झाली आहे. महिला क्रिकेटमध्ये या स्थानापर्यंत पोचणारी ती जिल्ह्यातील पहिली युवती ठरली आहे. तिच्या रूपाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सधन शेतकरी, राजकीय व सहकार क्षेत्रात परिसरात नाव असलेल्या पाटील कुटुंबीयांची कविताला पार्श्वभूमी आहे. सुजाता व दिलीप पाटील यांना दोन मुलगे आहेत. कविता ही एकुलती मुलगी असल्याने घरात सर्वांची लाडकी. तिचे उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण प्रवरानगरला झाले. पुण्यातील ‘बीएमसीसी’ महाविद्यालयाची ती वाणिज्य शाखेतील पदवीधर आहे. सध्या ती रेल्वेत कार्यालयीन अधीक्षक पदावर कार्यरत आहे. तिचे आजोबा दिवंगत शिवाजीराव पाटील हे उत्कृष्ट खेळाडू होते. वडील दिलीप पाटील, काका रंजित पाटील हेही उत्कृष्ट खेळाडू. त्यामुळे कविताला खेळाडूच्या अंगी असाव्या लागणाऱ्या गुणांचे बाळकडू मिळाले. बालवयात बास्केटबॉलची आवड असणारी कविता महाविद्यालयीन जीवनात क्रिकेटकडे आकर्षित झाली. तिने महिला (१९ वर्षीय वयोगट) क्रिकेटच्या महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले आहे. आता तिची भारतीय ‘अ’ संघात निवड झाली आहे. येत्या डिसेंबरमध्ये कर्नाटकात बांगलादेशचा महिला ‘अ’ क्रिकेट संघ दाखल होत असून भारतीय महिलांच्या ‘अ’ संघासोबत मालिका होणार आहे. हुबळीत दोन डिसेंबरपासून एकदिवसीय तीन सामने, बेळगावमध्ये १२ डिसेंबरपासून टी-२० चे तीन सामने होणार आहेत. भारतीय संघात कविता पाटीलचा समावेश आहे. अनुजा पाटील ही संघाची कर्णधार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com