मास्टर कार्डने "फूड' योजना थांबवली 

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

नेमार आणि मेस्सी यांनी केलेल्या प्रत्येक गोलला 10 हजार डॉलर मूल्याचे जेवण गरिबांना देण्याची "फूड' योजना ब्राझीलच्या प्रशिक्षकांनी केलेल्या टीकेनंतर "मास्टर कार्ड'ला गुंडाळावी लागली आहे.
 

साओ पावलो - नेमार आणि मेस्सी यांनी केलेल्या प्रत्येक गोलला 10 हजार डॉलर मूल्याचे जेवण गरिबांना देण्याची "फूड' योजना ब्राझीलच्या प्रशिक्षकांनी केलेल्या टीकेनंतर "मास्टर कार्ड'ला गुंडाळावी लागली आहे.

ब्राझील प्रशिक्षक टिटे यांनी या योजनेचे स्वागत करतानाच केवळ नेमारनेच केलेल्या गोलची निवड का, संघात अन्यही खेळाडू आहेत, तसेच यामुळे वैयक्तिकदृष्ट्या खेळाडूंवर विनाकारण दडपण येत असल्याची टीका केली होती. या टीकेनंतरच मास्टर कार्डने हा निर्णय घेतला. मास्टर कार्डची ही "फूड' योजना 2020पर्यंत होती. 
 

Web Title: Mastercard ends meals-for-goals campaign with Neymar, Messi after backlash

टॅग्स