INDvsAUS : स्वातंत्र्यानंतर अशी कामगिरी करणारा मयांक पहिलाच भारतीय

बुधवार, 26 डिसेंबर 2018

उसळती खेळपट्टी आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या मैदानावर पदार्पण करायचे, ऑस्ट्रेलियाच्या भेदक वेगवान गोलंदाजांचा सामना करायचा, आततायीपणा न करता संघाला अपेक्षिक सुरवात करुन देणे अशा 'चेकलिस्ट'मधील सर्व गोष्टी पूर्ण करत मयांक अगरवालने पहिल्याच कसोटी सामन्यात अर्धशतक झळकाविले.

मेलबर्न :  उसळती खेळपट्टी आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या मैदानावर पदार्पण करायचे, ऑस्ट्रेलियाच्या भेदक वेगवान गोलंदाजांचा सामना करायचा, आततायीपणा न करता संघाला अपेक्षिक सुरवात करुन देणे अशा 'चेकलिस्ट'मधील सर्व गोष्टी पूर्ण करत मयांक अगरवालने पहिल्याच कसोटी सामन्यात अर्धशतक झळकाविले. गेले अनेक सामने भारतीय संघाला ज्या सलामीवीराचा शोध होता तो अखेर मयांक अगरवालमुळे थांबला.

कसोटी पदर्पणात ऑस्ट्रेलियामध्ये अर्धशतक झळकाविणारा तो केवळ दुसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी 1947 मध्ये दत्तु  फडकर यांनी सिडनी क्रिकेट मैदानावर पदार्पणाच्या सामन्यात 51 धावा केल्या होत्या.

तसेच मयांक ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी संघात पदार्पण करणाराही केवळ दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 1947 मध्येच आमिर ईलाही यांनी सिडनी क्रिकेट मैदानावर पदार्पण केले होते. 

तंत्रशुद्ध फलंदाजीच्या जोरावर, प्रत्येक चेंडूची जात पारखत त्याने फटक्यांची निवड करत त्याने फलंदाजी केली. 36व्या षटकांत नॅथन लायना दोन चौकार मारत त्याने ऐटीत आपले पहिले कसोटी अर्धशतक पूर्ण केले.

Web Title: Mayank agarwal scores a maiden half century in Melbourne test