लवकरच माझ्या कारकिर्दीची अखेर होईल- साईना

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

लोकांना वाटत असेल की माझी कारकिर्द संपुष्टात आली, ते माझ्यासाठी चांगलेच आहे. कारण, लोक माझ्याबाबत खूप विचार करतात. 

नवी दिल्ली - गुडघ्याच्या दुखापतीतून नुकतीच सवारलेली भारताची बॅडमिंटनपटू साईना नेहवालने माझी कारकिर्द लवकरच संपुष्टात येईल, असे वाटत असल्याचे म्हटले आहे.

ईएसपीएन डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत साईनाने आपल्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. रिओ ऑलिंपिकमध्ये प्राथमिक फेरीतच बाहेर व्हावे लागलेल्या साईनाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता ती 15 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या चीन ओपन सुपर सिरीज स्पर्धेतून बॅडमिंटन कोर्टवर पुनरागमन करणार आहे. मात्र, त्यापूर्वीच तिने निवृत्तीविषयी भाकीत करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

साईना म्हणाली की, मी आता विजय-पराभवाबद्दल विचार करतच नाही. अनेक जणांना माझी कारकिर्द संपल्याचे आणि मी पुनरागमन करणे अवघड असल्याचे वाटत आहे. माझ्या मनातही असेच प्रश्न अनेकवेळा येत आहे. माझी कारकिर्दी लवकरच संपुष्टात येईल, हे शक्य आहे. बघूया पुढे काय होते. त्याबाबत आताच कोणी सांगू शकत नाही. लोकांना वाटत असेल की माझी कारकिर्द संपुष्टात आली, ते माझ्यासाठी चांगलेच आहे. कारण, लोक माझ्याबाबत खूप विचार करतात. 

Web Title: maybe it is the end of my career says indian shuttler saina nehwal