मीराबाईचे जागतिक पदक हुकले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

मीराबाई चानूने जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या 49 किलो गटात दोनशे किलो वजन उचलण्याचे लक्ष्य गाठले, पण त्यानंतरही तिला पदकापासून वंचित रहावे लागले. क्‍लीन अँड जर्कच्या अखेरच्या प्रयत्नात मीराबाई 118 किलो वजन पेलू शकली नाही आणि तिचे पदक हुकले.

मुंबई : मीराबाई चानूने जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या 49 किलो गटात दोनशे किलो वजन उचलण्याचे लक्ष्य गाठले, पण त्यानंतरही तिला पदकापासून वंचित रहावे लागले. क्‍लीन अँड जर्कच्या अखेरच्या प्रयत्नात मीराबाई 118 किलो वजन पेलू शकली नाही आणि तिचे पदक हुकले.

पट्टाया (थायलंड) येथील स्पर्धेत भारतास पदकाच्या सर्वाधिक आशा मीराबाईकडून होत्या. तिने स्नॅचमध्ये 87 किलो, तसेच क्‍लीन अँड जर्कमध्ये 114 किलो असे एकूण 201 किलो वजन पेलले. ही तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे, तसेच राष्ट्रीय विक्रमही तिने मोडीत काढला.

मीराबाईला स्नॅचमध्ये अखेरच्या प्रयत्नात 89 किलो वजन उचलता आले नाही, त्यामुळे ती या टप्प्यानंतर पाचवी होती. तोच प्रयत्न साधला असता तर ती तिसरी आली असती. आता क्‍लीन अँड जर्कमध्ये तिला शरीराचे वजन तिसऱ्या क्रमांकावरील स्पर्धकापेक्षा जास्त असल्यामुळे एकंदरीतच आघाडी हवी होती, पण 118 किलोचा प्रयत्न विफल ठरल्याने पदकापासून वंचित रहावे लागले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meerabai chanu miss the world champion medal