मेस्सीला दुखापत, तरीही बार्सिलोनाची सरशी

लिओनेल मेस्सी
लिओनेल मेस्सी


माद्रिद : बार्सिलोनाने आपली गाडी काहीशी रुळावर आणताना ला लिगा अर्थात स्पॅनिश लीग फुटबॉलमध्ये व्हिलारेयालला 2-1 असे हरवले, पण बार्सिलोनाच्या विजयापेक्षाही चर्चा झाली ती लिओनेल मेस्सीच्या दुखापतीची. मांडीचा स्नायू दुखावल्याने मेस्सी उत्तरार्धात मैदानात उतरला नाही.

विश्रांतीच्या दरम्यान मेस्सीवर उपचार करण्यात आले, पण तो उत्तरार्धात मैदानावर उतरला नाही. काही दिवसांपूर्वीच मेस्सीने पुनरागमन केले होते, पण त्यानंतरही तो पूर्ण तंदुरुस्त नसल्याचे सांगितले जात होते. या पार्श्‍वभूमीवर मेस्सीची दुखापत गंभीर असेल असे मानले जात आहे.

मेस्सीची दुखापत फारशी गंभीर वाटत नाही. आम्ही खबरदारी म्हणून त्याला मैदानात उतरवले नाही. अर्थात पूर्ण वैद्यकीय तपासणीनंतर याबाबत काहीही बोलणे योग्य होईल, असे बार्सिलोनाचे मार्गदर्शक एर्नेस्टो वॅल्वेर्दे यांनी सांगितले. वॅल्वेर्दे यांच्यासाठी विजय जास्त मोलाचा होता. गोलफरक चुरशीची लढत दाखवत असला तरी प्रत्यक्षात बार्सिलोनाची हुकूमत सहज दिसत होती, हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते.

टॉटनहॅमची धक्कादायक हार
लंडन ः टॉटनहॅमला लीग कप फुटबॉल स्पर्धेत चौथ्या श्रेणीच्या स्पर्धेत खेळणाऱ्या कॉल्चेस्रविरुद्ध हार पत्करावी लागली. निर्धारित वेळेतील गोलशून्य बरोबरीनंतर टॉटनहॅम पेनल्टीवर 3-4 पराजित झाले. कॉल्चेस्र संघ लीग दोनमध्ये सध्या दहावा आहे. चॅम्पियन्स लीग उपविजेते टॉटनहॅम प्रथमच या स्पर्धेत खालच्या लीगमधील संघाविरुद्ध पराजित झाले. मॅंचेस्टर सिटीने विजेतेपद राखण्याची मोहीम कायम ठेवताना प्रेस्टॉनला 3-0 असे हरवले, तर आर्सेनलने नॉटिंगहॅम फॉरेस्टचा 5-0 धुव्वा उडवला. साऊदम्प्टन, लिस्टर तसेच एव्हर्टननेही आपल्या लढतीत सहज विजय मिळवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com