मेस्सी म्हणजे मॅराडोना नव्हे - क्रेस्पो 

वृत्तसंस्था
सोमवार, 18 जून 2018

लिओनेल मेस्सी म्हणजे काही मॅराडोना नाही. तो एकटा अर्जेंटिनाला विश्‍वकरंडक जिंकून देऊ शकत नाही. त्याला इतरांची साथ मिळायला हवी, अशी टीका अर्जेंटिनाचा माजी आक्रमक हेर्नन क्रेस्पो याने केली आहे. 
 

ब्यूनोस आयर्स - लिओनेल मेस्सी म्हणजे काही मॅराडोना नाही. तो एकटा अर्जेंटिनाला विश्‍वकरंडक जिंकून देऊ शकत नाही. त्याला इतरांची साथ मिळायला हवी, अशी टीका अर्जेंटिनाचा माजी आक्रमक हेर्नन क्रेस्पो याने केली आहे. 

आईसलॅंडविरुद्धच्या सामन्यात अर्जेंटिनाला बरोबरीवर समाधान मानावे लागले. यात मेस्सीला पेनल्टी किक घेता न आल्याने त्याच्यावर टीका होत आहे. या सामन्यात मेस्सीने जाळीच्या दिशेने 11 शॉट्‌स मारले; पण एकही जाळीचा वेध घेऊ शकले नाहीत. मात्र, क्रेस्पो हे मान्य करायला तयार नाही. अर्जेंटिनाकडून 64 सामने खेळलेला क्रेस्पो म्हणाला, ""मॅराडोना आणि मेस्सी यांच्यात फरक आहेत.

मेस्सी गुणवान खेळाडू आहे, म्हणून तो मॅराडोना होऊ शकत नाही. मैदानात त्याला अन्य सहकाऱ्यांकडून मदत मिळायला हवी. त्याच्यासाठी संधी निर्माण करण्याचे काम त्यांचे आहे. मेस्सीनेच संधी निर्माण करायच्या आणि त्याने गोल करायचे हे योग्य नाही.'' 

Web Title: Messi is not Maradona says Crespo