Miami Open tournament : कोरोना लशीच्या मुद्द्यावरून जोकोविचची मियामी स्पर्धेतून माघार

कोरोना लशीच्या मुद्द्यावरून अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचने पुढील आठवड्यापासून सुरू
Australian Open novak djokovic
Australian Open novak djokovicsakal

मियामी : कोरोना लशीच्या मुद्द्यावरून अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचने पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या मियामी ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. कोरोना लस न घेतल्यामुळे जोकोविचला अमेरिकेत प्रवेशबंदी आहे.

परिणामी तो मियामी स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पर्धा संचालक जेम्स ब्लेक यांनी सांगितले. जोकोविचसाठी अपवाद करावा आणि त्याला स्पर्धेत खेळता यावे, यासाठी आम्ही प्रयत्न केले; परंतु ते शक्य झाले नाही, असे ब्लेक म्हणाले. मियामी ओपन ही टेनिस क्षेत्रातील एक महत्त्वाची स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूंनी खेळावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. जोकोविचसाठी आम्ही सरकारलाही विनंती केली;

परंतु सरकारचा निर्णय आमच्या हाती नसतो, अशी निराशा ब्लेक यांनी व्यक्त केली. मियामी ओपन स्पर्धा जोकोविचने सहा वेळा जिंकलेली आहे. सध्या कॅलिफोर्नियात सुरू असलेल्या मास्टर्स स्पर्धेतही जोकोविच कोरोना लशीच्या मुद्द्यावरूनच खेळत नाही. कोरोना लस न घेतलेल्या कोणत्याही परदेशी व्यक्तीला अमेरिकत प्रवेश दिला जात नाही. ११ मेपासून लावण्यात आलेला हा नियम अजूनही कायम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com