मीराबाई चानूची विक्रमासह सुवर्णला गवसणी

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 एप्रिल 2018

वेटलिफ्टिंगमध्ये आज (गुरुवार) झालेल्या 48 किलो वजनी गटाच्या स्पर्धेत मीराबाईने स्नॅच प्रकारात पहिल्या प्रयत्नात 80 किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रम नोंदविला. त्यानंतर तिने दुसऱ्या प्रय़त्नात 84 आणि तिसऱ्या प्रय़त्नात 86 किलो वजन उचलले आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वोत्तम 85 किलो वजन उचलण्याचा विक्रम मोडीत काढत नवा विक्रम आपल्या नावावर नोंदविला.

गोल्ड कोस्ट : जागतिक चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 48 किलो वजनी गटात विक्रमासह सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्ण पदक आहे.

वेटलिफ्टिंगमध्ये आज (गुरुवार) झालेल्या 48 किलो वजनी गटाच्या स्पर्धेत मीराबाईने स्नॅच प्रकारात पहिल्या प्रयत्नात 80 किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रम नोंदविला. त्यानंतर तिने दुसऱ्या प्रय़त्नात 84 आणि तिसऱ्या प्रय़त्नात 86 किलो वजन उचलले आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वोत्तम 85 किलो वजन उचलण्याचा विक्रम मोडीत काढत नवा विक्रम आपल्या नावावर नोंदविला. याबरोबरच तिने क्लिन अँड जर्क प्रकारातही पहिल्या प्रयत्नात 103 किलो, दुसऱ्या प्रय़त्नात 107 किलो आणि तिसऱ्या प्रय़त्नात 110 किलो वजन उचलून सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. 

चानूला सुरवातीपासूनच सुवर्ण पदकाचा दावेदार मानले जात होते. चानूने 2014 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. आता तिने याचे रुपांतर सुवर्णपदकात केले. भारताला आतापर्यंत या स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळाले आहे. वेटलिफ्टिंगमध्येच 56 किलो वजनी गटात गुरुराजाने रौप्यपदक मिळविले होते.

Web Title: Mirabai Chanu wins Indias first gold at CWG2018 in women's weightlifting 48 kg

टॅग्स