मल्टिप्लेक्‍स, मॉलपेक्षा रनिंग करण्यात संडे जावा!

हर्ष-मिताली-दिपक उपाध्ये धावतात तेव्हा आनंदित होतात!
हर्ष-मिताली-दिपक उपाध्ये धावतात तेव्हा आनंदित होतात!

मी हिमालय- सह्याद्रीत ट्रेकिंग केले आहे. याशिवाय सायकलिंग आणि पॅराग्लायडिंगचीही मला आवड आहे. मी डॉक्‍टर आहे. पाच वर्षांपूर्वी मला अचानक कॅन्सर झाला, फोर्थ स्टेजला होता. कॅन्सर पेशंटच्या बाबतीत होते तसेच होऊन मी तणावाखाली आले. डॉक्‍टर असूनही आणि इतका फिटनेस करूनही असे का घडले, असा प्रश्‍न मला खायला उठायचा; पण डॉक्‍टर असल्यामुळे मी लवकर सावरले. केमो-रेडिओथेरपी न घेता होलिस्टिक ट्रीटमेंट घेतली. त्यामुळे माझी शारीरिक स्थिती फार खालावली नव्हती. त्याच सुमारास निखिल शहा मला भेटले. ‘पुणे रनिंग’ची ओळख झाली आणि मी धावू लागले. शस्त्रक्रियेनंतर जेमतेम चार महिन्यांत मी मॅरेथॉनमधील पाच किमी अंतराच्या शर्यतीत भाग घेतला. माझ्यासाठी हे आणि हर्षसुद्धा धावला. आम्हा तिघांना मेडल्स मिळाली. धावण्याने माझा कॅन्सर पळून गेला! २०१६ मध्ये मी एव्हरेस्ट बेस कॅंप ट्रेक केला. पाच किमी शर्यतीपासून सुरवात करीत मी हाफ मॅरेथॉनपर्यंत मजल मारली आहे. माझी वेळ दोन तास ३० ते दोन तास ४० मिनिटांच्या घरात आहे. माझ्या आजारपणात धावण्यामुळे आमचे फॅमिली बाँडिंग झाले. अशी वेळ कुणावर येऊ नये हीच सदिच्छा! पण त्यासाठी मॉल किंवा मल्टिप्लेक्‍समध्ये वीकेंड न घालविता रनिंगमध्ये घालवावा हाच माझा संदेश अन्‌ त्यासाठी शुभेच्छा!

पुण्याच्या मिताली उपाध्ये डॉक्‍टर
जून २०१३ मध्ये बीजकोशाच्या (ओव्हरी) कॅन्सरचे निदान
जुलैमध्ये शस्त्रक्रिया
त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये सहा किमी शर्यतीत भाग घेत पदक
त्यांना पाठिंबा देण्यासाठी पिता-पुत्र दीपक-हर्ष हेसुद्धा सहभागी

ग्रुप बुकिंगला डिस्काउंट
नऊ डिसेंबरच्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये कुणीही सहभागी होऊ शकतो. ग्रुपने येणाऱ्यांना नोंदणी शुक्‍लात सवलत दिली जाईल.
गृहनिर्माण संस्थांमधील सभासद पुढाकार घेऊ शकतात.
शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थीसुद्धा एकत्र येऊन धावू शकतात.
डॉक्‍टर, वकील, शिक्षक, अशा विविध क्षेत्रांतील मंडळी.
मैत्रिणी-मैत्रिणीही येऊ शकतात मिळून साऱ्या जणी!
सायकलिंग, ट्रेकिंग असे वैविध्यपूर्ण छंद हौसेखातर किंवा निष्ठेनेही जपणारी मंडळी.

पुणे हाफ मॅरेथॉन हा उपक्रम अत्यंत चांगला असून, आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही उपयुक्त आहे. यात अधिकाधिक महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी व्हावेत, यासाठी प्रयत्न करू. मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोचविला जाईल. विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्यासाठी धावण्याचे महत्त्व यानिमित्ताने सांगता येणार आहे.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

धकाधकीच्या आयुष्यामध्ये सर्वांनी आरोग्याची उत्तम काळजी घेणे अत्यावश्‍यक झालेले आहे. मी दररोज माझ्या मित्रांबरोबर चालायला किंवा टेनिस खेळायला जातो. त्यामुळे मला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते. आपण जेवढे तंदुरुस्त राहू तेवढे शरीर साथ देईल आणि म्हणूनच विविध व्यायाम, चालणे, धावणे, खेळणे, पोहणे यापैकी काहीतरी दररोज करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक असलेला पुणे हाफ मॅरेथॉन हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून, ‘परांजपे स्कीम्स’तर्फे अनेक शुभेच्छा!
- शशांक परांजपे, व्यवस्थापकीय संचालक, परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्‍शन)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com